ख्रिसमस पार्टीमध्ये दिसायचे असेल सर्वात हटके तर वापर ‘या’ सोप्या टिप्स

आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व पार्टीत सर्वात रुबाबदार आणि आकर्षक दिसेल.

डिसेंबर महिना हा ख्रिसमससाठी (Christmas) ओळखला जातो शिवाय वर्षाचा शेवटचा महिना असल्याने अनेकांसाठी हा महिना आवडता असतो. ख्रिसमसच्या निमित्याने या महिन्यात अनेक जण खरेदी करतात. अनेक ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे आयोजन होत असल्याने या पार्टीत आपण सगळ्यांपेक्षा हटके आणि आकर्षक कसे दिसू याबद्दलही अनेक जण विचार करत असतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व पार्टीत सर्वात रुबाबदार आणि आकर्षक दिसेल.जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.

पोशाख

ख्रिसमसला ध्यानात ठेऊन तुम्ही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये पोशाख परिधान करा. तुम्ही हवे असल्यास फैशनबल साडी, गाऊन किंवा शॉर्ट ड्रेस घालू शकता. याशिवाय तुम्ही जीन्स टॉप सोबत जॅकेटसुद्धा घालू शकता

फुटवेअर

तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे फुटवेअर निवडा. जसे साडीसोबत तुम्ही सैंडल घालू शकता. जर तुम्ही गाऊन परिधान करीत असाल तर हिल्स वापरू शकता. शॉर्ट स्कर्ट सोबत तुम्ही बूट घातल्यास अधिक आकर्षक दिसाल. जीन्स सोबत तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचे बूट घातल्यास जास्त आकर्षक दिसेल.

ज्वेलरी

यालासुद्धा तुम्ही तुमच्या डकपड्यानुसार वापरू शकता. मोठ्या मोठ्या स्टारच्या इअर रिंग तुम्ही शॉर्ट स्कर्टसोबत वापरू शकता. साडीसोबत झुमके आणि गळ्यात छोटे पेंडंट घालू शकता.

मेकअप

ख्रिसमस पार्टीमध्ये सर्वात आकर्षक दिसण्यासाठी आयमेअप वॉर जास्त भर द्या. थीम अनुसार शायनी लाल कलरचे आय शॅडो वापरा, याशिवाय लिप्स्टिकसुद्धा लाल  कलरचेच वापरा