hair care tips for holi

होळीत वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे केसांवर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो.(how to save your hair from the colors of holi) केसांना रंगाच्या दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता.

  होळी(holi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीत वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे केसांवर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. केसांना रंगाच्या दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. ज्यामुळे तुमचे केस सुरक्षित राहतील. केसांवर रंगाचा परिणाम होऊ नये म्हणून काही तेलांचा(use oil for hair) वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

  मोहरीचे तेल-मोहरीच्या तेलामध्ये प्रथिन, सेलेनियम, व्हिटॅमिन बी,ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते. हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. या तेलामुळे केसांचे रंगांमुळे नुकसान होत नाही. या तेलाने केसांना मालिश करून होळी खेळा.  नंतर शॅम्पू करून घ्या.

  बदामाचे तेल – फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन इ ने समृद्ध बदामाचे तेल मॉयश्चराइझरचे काम करतो. केसांना निरोगी ठेवतो. केसांचा कोंडा आणि स्कॅल्पमधील संसर्ग दूर करतो. होळीमध्ये या तेलाने केसांना मालिश करा.

  ऑलिव्ह तेल – ऑलिव्ह तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केसांचे सौंदर्य वाढवते. या तेलामुळे केसांची चांगली वाढ होते. ऑलिव्ह तेलामध्ये असलेल्या अँटीऑक्सीडंट्स कंडिशनरचे काम करतात. केसांना सुरक्षित ठेवतात. होळीला या तेलाचा वापर केसांना मालिश करण्यासाठी करु शकता.

  नारळाचे तेल – नारळाच्या तेलामध्ये आढळणारे असेन्शियल फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन केसांच्या मुळाच्या जवळ जमलेले सिबम काढून टाकतात . केसांची वाढ होण्यास मदत करतात. स्कॅल्पला पोषण देतात. होळीच्या रंगांपासून वाचविण्यासाठी नारळाच्या तेलाने मालिश करु शकता.

  होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करायचे असेल तर या लेखात उल्लेख केलेल्या कोणत्याही एका तेलाचा वापर करा. केसांना तेल लावून घ्या आणि सुरक्षितपणे होळी खेळा.