Kiersten Milligan Tattoos in the eyes

तरुणाईमध्ये टॅटू आणि पियर्सिंगबद्दल क्रेझ वाढतच चालली आहे. लोकांनी टॅटूद्वारे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेकांनी स्वतःच्या पूर्ण शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. अमेरिकेतील एक महिला सध्या चर्चेत आहे. तिने स्वतःच्या डोळ्यांमध्येच टॅटू काढून घेतला आहे. टेक्सासची रहिवासी असलेल्या कियर्स्टिन मिलिगनला यानंतर लोक वेगळ्याच नावाने हाक मारू लागले आहेत(Kiersten Milligan Tattoos in the eyes).

  स्वतःच्या शरीराला मॉडिफाय करण्यासाठी तिने आतापर्यंत 63 हजार डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. डोळ्यांमध्ये टॅटू काढून घेतल्यावर लोक मला ‘दानव’ म्हणत असल्याचे ती सांगते. अनोळखी लोक देखील तिला याबद्दल स्वतःचे मत सांगत असतात. तिच्या टॅटूबद्दल तिरस्कार वाटत असल्याचे हे लोक तिला सांगत असतात. एकीकडे अनेक लोक तिच्या टॅटूसाठी तिरस्कार करत असले तरीही कियर्स्टिन अशा लोकांची पर्वा करत नाही. याउलट ती अधिक बॉडी मॉडिफिकेशन करू इच्छिते.

  2021 च्या प्रारंभी 22 वर्षीय कियर्स्टिनने स्वतःच्या डोळ्यावर टॅटू काढून घेतला होता. वयाच्या 14 व्या वर्षी तिने पहिला टॅटू काढून घेतला होता. केवळ टॅटूच नव्हे तर फेंग आणि बेस्ट इम्प्लांटवरही तिने सुमारे 21 हजार डॉलर्स खर्च केले आहेत. तिने स्वतःच्या बॉडीवर अनेक ठिकाणी पियर्सिंग करविले आहे. टिकटॉकवर तिला 6 लाख 90 हजारांहून अधिक जण फॉलो अरतात. मी अशाप्रकारे दिसू इच्छित होते. लहानपणापासून माझ्या डोक्यात हा विचार होता जो मी अखेरीस पूर्ण केल्याचे ती सांगते.

  2020 मध्ये माझ्या टॅटूंमध्ये गळ्यावर एक मोथ, खांद्यावर एक गुलाबाचा खंजीर, मानेवर हिब्रूत काही तरी लिहिलेले आही. चालू वर्षी माझ्या डोक्यावर एक फुलपाखूर, माझ्या चेहऱ्यावर गुलाबासह खंजीर तर डोळ्यांवर टॅटू आहे. माझ्या पोटावर फुलपाखरं आणि स्ट्रॉबेरीचा टॅटू काढून घेतला असल्याचे तिने म्हटले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022