chandan face pack

चंदनाच्या फेस पॅकमुळे त्वचेचे काही विकार असतील तर ते दूर होतील. चेहऱ्यावर तेज येईल. तसेच हा नैसर्गिक फेस पॅक असल्याने याचा कोणताही साईडइफेक्ट होणार नाही. चंदनाचा फेस पॅक बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.(Method Of Sandalwood Face Pack)

    ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किनसाठी(Glowing And Soft Skin) महिला खूप वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरत असतात. मात्र काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये(Beauty Products) रसायनांचा वापर होत असल्याने सेन्सेटीव स्किनला त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची काळजी(Skin Care) घ्यायची असेल तर तुम्ही घरीच चंदन फेस पॅक तयार करु शकता.

    चंदनाच्या फेस पॅकमुळे त्वचेचे काही विकार असतील तर ते दूर होतील. चेहऱ्यावर तेज येईल. तसेच हा नैसर्गिक फेस पॅक असल्याने याचा कोणताही साईडइफेक्ट होणार नाही. चंदनाचा फेस पॅक बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.(Method Of Sandalwood Face Pack)

    साहित्य – चंदन पावडर – १ मोठा चमचा, गुलाब पाणी – १ मोठा चमचा, कच्च दूध – १ मोठा चमचा, हळद – चिमुटभर

    कृती – सगळ्यात आधी एका छोट्या वाटीत चंदन पावडर, गुलाबपाणी, दूध आणी हळद मिक्स करा. तयार फेसपॅक चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावून १५-२० मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने चेहरा आणि मान धुवा.

    चंदनाच्या फेसपॅकचे फायदे

    • या फेसपॅकमुळे मुरमांची समस्या कमी होते. चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
    • चेहरा तजेलदार दिसतो.
    • उन्हामुळे काळवंडलेली त्वचा नीट होण्यास मदत होते.
    • त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा नरम होते.
    • चेहऱ्याचा रंग उजळण्यासोबतच त्वचा मऊ होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.