glowing skin

रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने (Diwali Festive Glow Tips)ती चमकते आणि निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स(Beaty Tips) देत आहोत, ज्या तुम्ही रोज झोपण्यापूर्वी वापरल्या तर तुमची त्वचा(Skin Care) सकाळी मऊ आणि चमकदार होईल.तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून तुमच्या चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो आणू शकता. 

    दिवाळीमध्ये(Diwali) सुंदर दिसाव चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो(Festive Glow) असावा, असं सगळ्यांनाच वाटत असतं. रात्रीच्या वेळी त्वचेची (Skin Care Tips)काळजी घेतल्याने ती चमकते आणि निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स(Beauti Tips) देत आहोत, ज्या तुम्ही रोज झोपण्यापूर्वी वापरल्या तर तुमची त्वचा सकाळी मऊ आणि चमकदार होईल. या टिप्स दररोज वापरल्या तर येत्या दिवाळीपर्यंत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो आणू शकता. तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून तुमच्या चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो आणू शकता.  त्यासाठी कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊयात.

    दूध – रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर दूध लावा. जर तुम्ही दूध लावून थोडा वेळ मालिश केली तर ते चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर झोपा आणि सकाळी उठून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहरा सुंदर बनवण्यासोबतच दूध चेहऱ्याची नैसर्गिक ओलावाही राखतो. चेहरा चमकदार आणि मुलायम होतो.

    फेसवॉश आणि मॉइश्चुरायजरचा वापर – दिवसभर बाहेरील धूळ चेहऱ्यावर साचते. झोपण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा. फेस वॉश लावल्यानंतर लगेचच चेहऱ्याला मॉइश्चराइज करायला विसरू नका. मॉइश्चुरायजरमुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि चेहऱ्याचं पोषण होतं.

    ग्लोसाठी मध – मधाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील घाण साफ करून तो ग्लोइंग करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चेहऱ्यावर मध लावा आणि अर्धा तास सुकण्यासाठी सोडा. यानंतर चेहरा पाण्याने धुवून झोपा.