ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची अशी घ्या काळजी

जर तुम्ही संपूर्ण सेट स्टोअर करत असाल , तर कानातले एका वेगळ्या पिशवीत आणि नेकलेस एका वेगळ्या पिशवीत ठेवा..

  ऑक्सिडाइज ज्वेलरी ही आजकाल महिलांची पहिली पसंती आहे. स्त्रिया कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ड्रेससह मॅच करू शकतात अशी ही जेव्लरी आहे. सुंदर कानातल्यापासून ते जड हारांपर्यंत, हे दागिने अनेक वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. याच कारणामुळे आजकाल सोने, चांदी किंवा हिऱ्यापेक्षा या प्रकारच्या दागिन्यांचा कल वाढला आहे.परंतु ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना थोडी अधिक काळजी आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांची योग्य देखभाल करणे देखील महत्वाचे आहे.

  ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कशी ठेवली आणि साठवली जाऊ शकते आणि पुन्हा नव्यासारखी कशी दिसू शकते यासाठी काही टिप्स शेअर करत आहोत.

  सोप्या टिप्स
  – हवेच्या संपर्कात आल्यावर तुमचे दागिने अधिक ऑक्सिडाइझ झाले तर कोरडी टूथ पावडर आणि मऊ कापड वापरून ते हलक्या हाताने स्वच्छ करा आणि मूळ चमक परत येण्यास मदत होईल.

  – एका वाटीत टोमॅटो केच घेऊन त्यात दागिने ५-१० मिनिटे ठेवा. जेणेकरून डाग निघून जाण्यास मदत होईल. टोमॅटोमध्ये असलेले आम्ल ऑक्सिडाइज्ड दागिने नवीन ठेवण्यास मदत करते.

  – ऑक्सीडाइज दागिन्यांची चमक राखण्याचा सर्वात वेगवान आणि सोपा मार्ग म्हणजे टूथपेस्ट वापरणे. यासाठी फक्त दागिन्यांवर पांढरी टूथपेस्ट घासून कोमट पाण्याने धुवा.

  – बेकिंग सोडासह ऑक्सिडाइज्ड दागिने चांगले घासून अर्धा तास ठेवा. नंतर कोमट पाण्याने ते धुवा.

  – एका भांड्यात ज्वेलरी घेऊन त्यावर व्हीनेगर टाका आणि व्यवस्थित ज्वेलरीला घासा. नंतर 15 मिनिटांसाठी ज्वेलरी तशीच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा व कोरडी करा.

  ‘असे’ करा स्टोअर
  – ऑक्सिडाइज्ड दागिने कधीही ओलावामध्ये ठेवू नका. या प्रकारचे दागिने थोड्याशा ओलावामध्ये खराब होऊ लागतात आणि त्याची चमकही हरवतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही ते साठवता तेव्हा लक्षात ठेवा की ते हवा आणि ओलावाच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घ्या.

  – जर तुम्ही संपूर्ण सेट स्टोअर करत असाल , तर कानातले एका वेगळ्या पिशवीत आणि नेकलेस एका वेगळ्या पिशवीत ठेवा.या पिशव्या एका एअर टाइट बॉक्समध्ये ठेवा. यामुळे दागिने बराच काळ सुरक्षित राहतात.