पैजणांचाही मेकओव्हर

बारीक चैनीप्रमाणे असणारे अँकलेट ड्रेसवर तसेच जिन्सवरही छान दिसते. यात विविध डिझाइन व रंगसंगतीही उपलब्ध आहेत.

    सध्या जुनीच फॅशन नवीन रूपात येत आहे. कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टींचा मेकओव्हर झाला आहे. पण यातही जुन्याच काही गोष्टी जास्त आकर्षक ठरत आहेत. यामुळे गळ्यातील हारापासून पायातील पैंजणांपर्यंत जुनीच फॅशन आता पुन्हा दिसू लागली आहे. त्यातही पैंजणाला आता अँकलेट म्हणून ओळखल जाऊ लागले आहे.

    लेस अँकलेट
    लेस अँकलेट हा प्रकार सध्या फॅशन बाजारात बराच चर्चेत आहे. हा अँकलेट लेसला विविध रंगात तसेच डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. हे अँकलेट नाजूक असून ते तितकेच सुंदरही दिसतात.

    डायमंड अँकलेट
    डायमंड म्हणजे सगळ्या मुलींचा वीक पॉइंट हे डायमंड अँकलेटसोबत तुम्ही उंच टाचांची चप्पल घातलात तर तुमच्या पायाची शोभा आणखी वाढेल.

    बटरफ्लाय अँकलेट
    नावाप्रमाणे अँकलेटमध्ये फुलपाखरू असणारे हे अँकलेट दिसायला सुंदर दिसते. त्यात काही फुले तसेच बारीक मणी पायाची आणखी शोभा वाढवतात.

    स्कूबी अँकलेट
    नायलॉनच्या दोऱ्याप्रमाणे असणाऱ्या स्कूबीपासून तुम्ही हे अँकलेट बनवू शकता. स्कूबी अँकलेट हे नाजूक व दिसायला फार सुंदर असतात. तुम्हाला हव्या असलेल्या रंगाच्या स्कूबीमध्ये तुम्ही ते बनवू शकता.

    चैन अँकलेट
    बारीक चैनीप्रमाणे असणारे अँकलेट ड्रेसवर तसेच जिन्सवरही छान दिसते. यात विविध डिझाइन व रंगसंगतीही उपलब्ध आहेत. याशिवाय काही इतर प्रकारही बाजारात उपलब्ध असून या अँकलेटची किंमत 50 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यत आहे.