‘हे’ फळ रोज खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईझ्ड राहते, बॉडी लोशनचा खर्च होतो कमी

आपल्या रोजच्या आहारात केळीचा (Banana) वेगवेगळ्या प्रकारे समावेश करा. हिवाळ्यात असे केल्याने तुम्ही तुमच्या त्वचेची चमक (Skin Glow) अनेक पटींनी वाढवू शकता आणि बॉडी लोशन (Body Lotion), नाईट क्रीमचा (Night Cream) वापरही कमी करू शकता. Why Should Eat Banana Every Day

  केळीत (Banana) त्वचेला मॉइश्चरायझिंग (Moisturizing Skin) करणारे गुणधर्म असतात. म्हणजेच, असे गुणधर्म जे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराईझ करतात आणि ती मऊ ठेवतात. यामुळेच हिवाळ्यात (Winter) त्वचेतील कोरडेपणा (Skin Dryness) वाढण्याची प्रक्रिया दररोज केळी खाल्ल्याने मंद होऊ शकते. दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. विशेषत: दररोज केळी खाणे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  रोज केळी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते

  केळीत पोटॅशियम आणि मँगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. मँगनीजचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कोलेजन हे एक आवश्यक प्रथिन आहे, जे स्वतः त्वचेच्या पेशींद्वारे तयार केले जाते.

  या प्रोटीनच्या मदतीने तुमची त्वचा तरुण आणि लवचिक राहते. त्वचेची लवचिकता राखली जाते. यासोबतच त्वचेची यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्यास त्वचेमध्ये निर्माण होणारी नैसर्गिक तेले त्वचा नैसर्गिकरीत्या मुलायम ठेवण्यास मदत करतात.

  केळी खाल्ल्याने वाढतो रेडिएंट ग्लो

  पोटॅशियम तुमच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते. त्यामुळे केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त या दोन्हींचा प्रवाह योग्य राहतो. ही स्थिती तुमच्या त्वचेला हिवाळ्याच्या काळात नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

  मध्यम आकाराच्या केळीत पुरेसे पोटॅशियम असते जे तुमच्या शरीराच्या रोजच्या गरजेच्या १० टक्के भाग पूर्ण करू शकते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका दिवसात केळीचा रतीबच लावावा. तुम्हाला फक्त १ केळी खायची आहे. जर केळीचा आकार खूप लहान असेल तर तुम्ही दोन केळी खाऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही.

  ओलावा गमावण्यापासून त्वचेला प्रतिबंध करते

  दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशींच्या दुरुस्तीचा वेग वाढतो. कारण केळ्यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात आणि त्यात व्हिटॅमिन-सी देखील असते.

  व्हिटॅमिन-सी तुमची त्वचा बरी होण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही रोज केळी खाल्ल्यास तुमच्या त्वचेच्या पेशींना व्हिटॅमिन-सी शरीराच्या आतून पोषण मिळते आणि त्वचा मुलायम राहते.

  केळी आणि दही फेस पॅक

  हिवाळ्यात तुम्ही केळी आणि दह्यापासून बनवलेला फेस पॅक त्वचेवर लावू शकता. अर्धी केळी, दोन चमचे दही आणि अर्धा चमचा मध. हे तिन्ही मिक्स करून त्वचेवर लावा आणि हा पॅक २० ते २५ मिनिटे कोरडा होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा. तुमच्या त्वचेचा रंग देखील सुधारेल आणि त्वचा देखील हायड्रेट राहील. त्यामुळे कोरडेपणा कमी होईल आणि लोशन किंवा क्रीमची गरज नक्कीच कमी होईल.