father died years ago left son 10 dollar to buy beer
बाबा म्हणाले बबड्याला, "मी गेल्यावर कर हे काम" यासाठी त्यांनी मुलाला ॲडव्हान्स दिले ७०० रुपये

अमेरिकेतल्या मसाचुसेट्स येथे राहणाऱ्या मॅटचे बाबा जॉन गुडमॅन यांचा ६ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांना कॅन्सर झाला होता. पण मृत्यू होण्याआधीच त्यांनी त्यांच्या पत्नीला ७३६ रुपये (१० डॉलर्स) दिले होते कारण मुलगा २१ वर्षांचा झाल्यावर पहिल्यांदा या पैशांची त्याने बिअर प्यावी.

एका वडिलांनी त्यांच्या मृत्यूआधीच ७३६ रुपये आपल्या पत्नीकडे यासाठी दिले कारण काही दिवसानंतर हे पैसे तिने आपल्या मुलाला द्यावेत. हे पैसे त्यांच्या मुलाने बिअरवर खर्च करावेत अशी या वडिलांची इच्छा होती. सोशल मीडियावर या पिता-पुत्रांची गोष्ट प्रचंड व्हायरल झालीये, जाणून घ्या काय आहे प्रकरण.

सीएनएनच्या अहवालानुसार, मॅट गुडमॅन नावाचा युवक २१ वर्षांचा झाला तेव्हा त्याला वाटलं की, त्याच्या या आनंदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज आपले वडील असायला हवे होते. पण, मॅट या गोष्टीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता की, वडिलांनी जाण्याआधीच एक भन्नाट गोष्ट त्याच्यासाठी ठेवली आहे.

अमेरिकेतल्या मसाचुसेट्स येथे राहणाऱ्या मॅटचे बाबा जॉन गुडमॅन यांचा ६ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांना कॅन्सर झाला होता. पण मृत्यू होण्याआधीच त्यांनी त्यांच्या पत्नीला ७३६ रुपये (१० डॉलर्स) दिले होते कारण मुलगा २१ वर्षांचा झाल्यावर पहिल्यांदा या पैशांची त्याने बिअर प्यावी.

वडिलांच्या मृत्यूनंतरही मॅटची आई आणि बहिणीने ही सिक्रेट गोष्ट त्यांच्याजवळच ठेवली होती. अखेरीस २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मॅटला बिअर पिण्यासाठी त्याच्या बाबांनी दिलेली रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली. मसाचुसेट्स मध्ये बिअर पिण्यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण व्हावी लागतात. ६ डिसेंबरला मॅटने त्याच्या बाबांनी दिलेले हे पैसे खर्च केले.

मॅटने ट्विटरवर जेव्हा वडिलांच्या पैशाने बिअर प्यायची ही गोष्ट शेअर करताच ते ट्विट व्हायरल झालं. बिअरची कंपनी बडवायजरही या ट्विटच्या एवढी आहारी गेली आणि मॅटकडे बिअरचे ८ बॉक्सेस पाठवून दिले.