FDCI X लॅक्मे फॅशन वीकने प्रत्यक्ष शोची केली घोषणा : ७ ते १० ऑक्टोबर २०२१ या काळात मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर (JWCC) येथे रंगणार सोहळा

हा ऑन-ग्राऊंड सोहळा तरुण ताहिलिआनी यांच्या कलेक्शनने सुरू होईल. त्यानंतर यात AK-OK बाय अनामिका खन्ना, अब्राहम ॲण्ड ठाकोर, MXS बाय मोनिशा जयसिंग आणि श्वेता बच्चन नंदा, सत्या पॉल बाय राजेश प्रताप सिंग, पंकज ॲण्ड निधी, ट्रॉय कोस्टा, गौरांग आणि अशा अनेक आघाडीच्या डिझायनर्सचा समावेश असणार आहे. लॅक्मे अब्सोल्युट ग्रँड फिनालेनी या भव्य सोहळ्याची सांगता होईल.

    मुंबई : FDCI X लॅक्मे फॅशन वीकने लॅक्मे, फॅशन डिझाइन कौन्सिल ऑफ इंडिया (एफडीसीआय) आणि राइज वर्ल्डवाईडच्या सहकार्याने पुन्हा एकदा काही निवडक डिझायनर्ससोबत प्रत्यक्ष शो करत असल्याची घोषणा केली आहे. एक्स्लुसिव्ह प्री-लाँच उपक्रम म्हणून अभ्यागतांना मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील आलिशान जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर (जेडब्ल्यूसीसी)चा अनुभव घेता येईल. यंदा ७ ते १० ऑक्टोबर २०२१ या काळात FDCI X लॅक्मे फॅशन वीक याच संकुलात रंगणार आहे.

    हा ऑन-ग्राऊंड सोहळा तरुण ताहिलिआनी यांच्या कलेक्शनने सुरू होईल. त्यानंतर यात AK-OK बाय अनामिका खन्ना, अब्राहम ॲण्ड ठाकोर, MXS बाय मोनिशा जयसिंग आणि श्वेता बच्चन नंदा, सत्या पॉल बाय राजेश प्रताप सिंग, पंकज ॲण्ड निधी, ट्रॉय कोस्टा, गौरांग आणि अशा अनेक आघाडीच्या डिझायनर्सचा समावेश असणार आहे. लॅक्मे अब्सोल्युट ग्रँड फिनालेनी या भव्य सोहळ्याची सांगता होईल.

    अशा महत्त्वाच्या इव्हेंटसाठी कर्टन रेझर ठरणारा लॅक्मे फॅशन वीक सोहळा सादर करण्यास जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर सज्ज झाले आहे. भारतातील अत्यंत महत्त्वाचे आणि अनोखे इव्हेंट्स करण्यासाठी इथे जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांसाठीची खास रचना आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या व्यावसायिक भागात रिलायन्सने मिश्र पद्धतींचा वापर करून हे अनोखे केंद्र उभारले आहे. या कन्व्हेंशन सेंटरमध्ये भारतातील सर्वोत्तम कन्व्हेंशन आणि एक्झिबिशन्ससाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

    लॅक्मे फॅशन वीकमधून या कन्व्हेंशन सेंटरची एक झलक दिसू शकेल. १८.५ एकरांवर पसरलेल्या आणि विविध सुविधा देऊ करणाऱ्या संकुलाचा हे सेंटर म्हणजे एक भाग आहे. ही भारतातील सर्वात मोठी कन्व्हेंशन फॅसिलिटी, आर्ट ॲण्ड कल्चर व्हेन्यू, प्रीमिअम रिटेल परिसर, अनोखा फूड ॲण्ड ब्रेव्हरेज अनुभव, लक्झ्युरिअस सर्विस रेसिडन्स आणि अल्ट्रा मॉर्डन ऑफिसेस अशा सोयी या ठिकाणी आहेत.

    FDCIXLFW ने शाश्वततेला नेहमीच आपला भक्कम पाया बनलं आहे. त्यामुळे कार्बन न्युट्रल इव्हेंट करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी फार महत्त्वाची आहे. कारण, जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर एलईईडी प्लॅटिनम प्रमाणित आहे.

    लॅक्मेच्या इनोव्हेशन विभागाच्या प्रमुख सुमती मट्टू म्हणाल्या, “ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट असे सर्व काही जगासमोर आणण्यात लॅक्मे फॅशन वीक नेहमीच आघाडीवर राहिले आहे. हा सीझनही त्याला अपवाद नाहीच. ही परिसंस्था अधिक विकसित करून आपल्या क्षेत्राची प्रगती साधण्यात, पुढे जाण्यात आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

    जेडब्ल्यूसीसीसारखे अत्याधुनिक कन्व्हेंशन सेंटर या प्रत्यक्ष सोहळ्यासाठी उपलब्ध झाल्याने आम्ही एफडीसीआयच्या साह्याने या व्यासपीठाला एक जागतिक दर्जाचा कार्यक्रम बनवण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.”

    एफडीसीआयचे अध्यक्ष सुनिल सेठी म्हणाले, “एफडीसीआयने लॅक्मे फॅशन वीकसोबत केलेल्या सहकार्यातून नेहमीच जागतिक दर्जाच्या फॅशनची निर्मिती झाली आहे. यावर्षी आमचा प्रत्यक्ष सोहळा अप्रतिम अशा जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये साजरा होतोय. त्यामुळे एक अतुलनीय अनुभव निर्माण करण्याची संधी आम्हाला यातून मिळाली आहे. आम्ही एक संपूर्णपणे नव्या पातळीवरील प्रदर्शन आणि सर्जनशीलता या अप्रतिम उपक्रमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.”

    राइज फॅशन ॲण्ड लाइफस्टाइलचे प्रमुख जसप्रीत चंडोक म्हणाले, “फॅशन वीकचा प्रत्येक सीझन अधिक खास असावा असा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही अधिक भव्य, अधिक बोल्ड अशा संकल्पना मांडतो. यंदाचा सीझन जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये सादर होतोय, याबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. इथे फारच उपयुक्त आणि सुयोग्य स्पेस आहेत शिवाय अखेर आम्हाला अशी एक जागा मिळाली जिथे FDCI X लॅक्मे फॅशन वीक हा जगातील एक सर्वात भव्य फॅशन वीक म्हणून साजरा होऊ शकेल.”