
जर डोक्यातील कोंड्याने (Dandruff) हैराण झाला असाल तर मेथीच्या दाण्यांमध्ये (fenugreek seeds) लिंबाचा रस (lemom juice) मिक्स करून तो केसांना लावा. हे फक्त कोंडाच दूर करणार नाही, तर लिंबात असलेल्या ॲसिडमुळे केसांचे नुकसानही होणार नाही.
लाभदायक ठरतात मेथीचे दाणे
केसांसाठी मेथीच्या दाण्यांचा (fenugreek seeds for hairs) उपयोग कोणास ठाऊक किती पिढ्यांपासून चालत आला आहे. या दाण्यांपासून तयार करण्यात येणारे वेगवेगळे पॅक्स अनेक प्रकारे लाभदायक ठरतात. यामुळे केस निरोगी आणि रेशमी होतात.
साधा पॅक
दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला. हे सकाळी पाण्यातून काढा आणि बारीक पेस्ट करा. ही पेस्ट अर्धा तास केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवा.
लिंबाच्या रसात मिक्स केल्यास
जर डोक्यातील कोंड्याने (Dandruff) हैराण झाला असाल तर मेथीच्या दाण्यांमध्ये (fenugreek seeds) लिंबाचा रस (lemom juice) मिक्स करून तो केसांना लावा. हे फक्त कोंडाच दूर करणार नाही, तर लिंबात असलेल्या ॲसिडमुळे केसांचे नुकसानही होणार नाही.
नारळाच्या तेलात मिक्स केल्यास
मेथीच्या दाण्याच्या पेस्टमध्ये दोन चमके नारळाचे तेल आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण केसांना निरोगी राखण्यासाठी आणि लांब होण्यासाठी लाभदायक ठरेल.
शिकेकाईसोबत मिक्स केल्यास
मेथीच्या दाण्याची पेस्ट शिकेकाईत मिक्स करा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांपाशी लावा. १५ मिनिटांनी केस धुवा. या उपायाचा अवलंब केल्यास केस घनदाट होण्यास मदत होईल.
दह्यासोबत मिक्स केल्यास
अर्धी वाटी बारीक केलेल्या दाण्यांच्या पेस्टमध्ये तीन चमचे दही मिक्स करा आणि हे केसांच्या मुळापासून ते संपूर्ण केसांना लावा. २० मिनिटांनी ते पाण्याने धुवा आणि थोडा शॅम्प घेऊन स्कॅल्प स्वच्छ करा. हे पॅक केसगळती रोखण्यास लाभदायक ठरेल.
तिळाच्या तेलासोबत वापरल्यास
२ टेबलस्पून मेथीचे दाणे, ३ चमचे तिळाचे तेल, आणि ४ पुदिन्याची पाने एकत्रित करून हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. मेथीचे दाणे फुटायला सुरुवात झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे मिश्रण गाळून घ्या. हे ऑईल केसांना मजबूती देईल आणि केसांची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.
मेहंदीसोबत
मेहंदी लावल्यावर तुम्हाला रुक्ष केस नको असतील तर, रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे किंवा त्याची पेस्ट एकत्र करून हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्यातासाने केस स्वच्छ धुवा.
हे तत्व ठरते लाभदायक
मेथीच्या दाण्यात पोट्याशियम व्हिटॅमिन ए, सी, के फॉलिक ॲसिड आयर्न सारखे घटक आढळतात. हा स्कॅल्प केसांना आणखी मुळांपासून केसांचे पोषण करून त्यांना मजबूत, कोमल आणि चमकदार होण्यासाठी मदत करतात.