ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात फ्रेंडशिप डे, जाणून घ्या

  फ्रेंडशिप डे दरवर्षी (Friendship) ऑगस्ट  महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो, मैत्रीचे मजबूत नाते साजरे करण्यासाठी एक खास दिवस आहे. मैत्रीसाठी हाच दिवस का जाणून घेणार आहोत.

  मैत्रीचं नातं शब्दात बांधता येणार नाही अशा धाग्याने बांधलेलं असतं. मैत्रीसाठी खास दिवस असावा याची तस तर काही गरज नसते. कारण मैत्रीत प्रत्येक दिवस हा खासच असते. फ्रेंडशिप डे (Friendship Day 2022) दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (First Sunday of August) भारतात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाला आपल्या खास मित्रासोबत संपूर्ण दिवस एन्जॉय करायचा असतो आणि आपलं नातं घट्ट करायचं असतं. यावर्षी ०७ ऑगस्ट (रविवार) रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.

  फ्रेंडशिप डेची सुरुवात अशी झाली (History)
  फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात परागुआपासून झाल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा १९५८ मध्ये मांडण्यात आला होता. यानंतर संयुक्त राष्ट्राने ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. मात्र भारत, बांगलादेश, अमेरिका असे अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात.

  ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day ) साजरा करण्यामागील कथाही लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की अमेरिकेत १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेल्या व्यक्तीचा एक खास मित्र होता, त्याला ही घटना कळताच त्यानेही निराशेने आत्महत्या केली होती.

  दोन मित्रांमधील अशी जोड पाहून अमेरिकन (America )सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो.