बाजारासारखी चव घरी बनवलेल्या आईस्क्रीमला हवी असेल तर ‘या’ टिप्स फॉलो करा

बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध असतात. पण घरी बनवललेया आईस्क्रीमची चवच वेगळी असते. घरच्या घरी चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरून आपण आईस्क्रीम घरी बनवतो.

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. बाहेर वाढत चालेल्या उन्हापासून थंडावा मिळवण्यासाठी आपण काहींना काही थंड पदार्थ खातो. यामध्ये प्रामुख्याने ताक, दही, आईस्क्रीम, शीत पेय यांचे जास्त सेवन केले जाते. मात्र अनेकदा आईस्क्रीम आपण घरीच बनवतो.बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध असतात. पण घरी बनवललेया आईस्क्रीमची चवच वेगळी असते. घरच्या घरी चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरून आपण आईस्क्रीम बनवतो. पण अनेक महिलांची नेहमी तक्रार असते की घरी बनवलेले आईस्क्रीम खराब होते. यामागे नेमकं काय कारण असू शकत? घरी आईस्क्रीम बनवत असताना हे सर्व प्रकार तुमच्यासोबत देखील घडले असतील तर आज आम्ही याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्समुळे तुम्ही अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीम सारखे आईस्क्रीम घरी बनवू शकतो. चला तर जर जाणून घेऊया..

  आईस्क्रीम बनवण्याच्या टिप्स:

  • घरी आईस्क्रीम बनवताना बऱ्याचदा बर्फ गोठण्याची समस्या सगळ्यांचं जाणवते. आईस्क्रीममध्ये बर्फाचे लहान लहान क्रिस्टल राहिल्यानंतर चव खराब होण्याची शक्यता असते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आईस्क्रीम क्लिंग फिल्म किंवा बटर पेपरने झाकल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवावा. असे केल्याने आईस्क्रीम नीट सेट होऊन चव बिघडत नाही.
  • आईस्क्रीम गोठवण्यासाठी शक्यतो कंटेनरचा वापर करावा. जे सपाट आणि जास्त खोल नसेल याची काळजी घ्यावी. योग्य कंटेनर निवडल्यानंतर आईस्क्रीम योग्यरीत्या सेट होते.
  • आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवल्यानंतर २ ते ३ तासांच्या अंतराने ते ढवळत राहिले पाहिजे. सतत ढवळत राहिल्याने बर्फाचे क्रिस्टल राहत नाही.

  आइस्क्रीममध्ये योग्य चव कशी मिळवावी:

  आईस्क्रीम बनवल्यानंतर किंवा बाजारातून आणून बरेच दिवस ठेवल्यानंतर आईस्क्रीमची चव बिघडते. तसेच कधी-कधी आइस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवल्यावर त्याचा सुगंध देखील खराब होतो. अशावेळी आईस्क्रीमची चव वाढवण्यासाठी दुधाचे पिठ थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचे इसेन्स वापरू शकता. यामुळे आईस्क्रीमची चव वाढते.