तुमचं मूल प्रत्येक बाबतीत होतंय हळवं, असा बनवा कणखर फॉलो करा टिप्स

आपल्या मुलांचे पालनपोषण करताना आईवडिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा मुलं जास्तच भावनिक होऊन जातात. पण त्यांना मानसिक दृष्ट्या कणखर आणि मजबूत करू शकतो.

  लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्याची सर्व जबाबदारी आईवडिलांची असते. प्रत्येक मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्व घडत जातात. आईवडील ज्याप्रमाणे आपल्या मुलांना वाढवतात, त्यांना संस्कार शिकवतात तशीच ती पुढे घडत जातात. मुलांच्या उत्तम संगोपनासाठी आईवडील अनेक गोष्टी करतात. पण काहीवेळेस त्याचा परिणाम मुलांवर वाईट पडतो. आईवडिलांनी केलेली एक छोटी चूक मुलांच्या मनात खोलवर जाऊन रुजते. त्यामुळे पालकत्त्व सांभाळताना आईवडिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही मुलं जास्तच भावनिक होऊन जातात. मुलांचा स्वभाव संवेदनशील होतो. मात्र तुमची मुले देखील अशीच भावनिक आहेत का?त्यांना कणखर बनवण्यासाठी या काही टिप्स नक्की वापरून पाहा.

  काही नमुने लक्षात ठेवा:

  जर तुमची जास्त भावनिक असतील तर त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवा. तुमची मुलं रोजच्यापेक्षा वेगळं काही वागत असतील तर त्यांच्याशी बोला. बोलल्यानंतर अनेक प्रश्न सुटतात. मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यानंतर ती हळूहळू आपल्याला त्यांच्या मनातील गोष्टी सांगू लागतील.आईवडील म्हणून तुम्ही मुलांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकाल.

  डोळ्यांनी संपर्क साधा:

  प्रत्येक आईवडिलांना काहीवेळेस आपल्या मुलांच्या मनात नेमकं काय चालल्या हे समजत नाही. अशावेळी त्यांच्याशी डोळ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. डोळ्यातून अनेकदा आपल्या भावना दिसून येतात. मुलांच्या हृदयाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत डोळ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलांमध्ये बरेच बदल घडून येतील.

  आपल्या मुलांना वेळ द्या:

  अनेकदा आईवडील कामाच्या व्यापातून आपल्या मुलांना वेळ देत नाहीत. पण असे केल्याने भावनिक दृष्ट्या मुलं आईवडिलांपासून लांब जातात. त्यामुळे जमेल तेवढं आपल्या मुलांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच त्यांच्यासोबत संयम राखुन बोलल्याने अनेक बदल घडून येतील.

  काटेकोरपणे वागू नका:

  तुमची मुलं जर जास्तच भावनिक असतील तर त्यांच्यासोबत नेहमी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांची भावनिकपणा हळूहळू कमी होऊन ती मानसिक दृष्ट्या मजबूत बनतील. जास्तीत जास्त भावनिक असलेली मुलं डोक्याने फार हुशार असतात. त्यामुळे मुलांना प्रेमाने समजवून त्यांच्याशी संवाद साधा.