लिपस्टीक खूप वेळ टिकावी यासाठी ‘हे’ उपाय करा

    लिपस्टीक ही महिलांनसाठी अतिशय गरजेच्या वस्तूंपैकी एक असते. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की ओठांवर लिपस्टीक फिवून आपण झटपट तयार होतो आणि निघतो. लिपस्टीक ही अतिशय आवडीची गोष्ट असते. ज्यांना लिपस्टीक आवडते त्यांच्या पर्समध्ये एखादी तरी लिपस्टीक आवर्जून असतेच. हे ठेवण्या मागचे कारण म्हणजे लिपस्टीक जास्त काळ टिकत नाही,  मग खूप बोलणे झाले किंवा खाणे-पिणे झाले की पुन्हा लिपस्टीक गेलेली असते. त्यामुळे आपल्याला सतत लक्ष ठेवून टच अप करत राहावे लागते.  यासाठी काही कास टिप्स…

    आपण साधारणपणे मॅट प्रकारातील लिपस्टीक नेहमीसाठी वापरतो. ही लिपस्टीक लावून आपण काही खाल्ले किंवा प्यायले तर लगेचच ती लिपस्टीक निघून जाते. अशावेळी लिपस्टीक लावल्यानंतर त्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावली तर ती लिपस्टीक अजिबात निघत नाही आणि ती ट्रान्सफर प्रूफ होते. लिपस्टीक आहे त्यापेक्षाही मॅट फिनिशिंग असल्यासारखी दिसते. खूप ऑयली जेवण जेवल्यावर ही लिपस्टीक थोडी फिकट होते पण ती नेहमीसारखी खूप जास्त निघून जात नाही. तुम्ही लिपस्टीक लावून काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही तर साधारण ५ ते ६ तास तुमची लिपस्टीक छान टिकून राहते. इतकेच नाही तर साध्या ब्रँडची स्वस्तातील लिपस्टीक असेल तरीही तुम्ही ही ट्रीक नक्की वापरु शकता.