१३४ वर्षांपासून सिक्रेट आहे कोका कोलाचा फॉर्मुला; जाणून घ्या हे कसे शक्य झाले!

कोका कोला कंपनीने यापैकी काही गोष्टीना दुजोरा दिला आहे. असे असले तरी नक्की किती लोकांना तो फॉर्म्युला माहित आहे किंवा इतर कोणतीही माहिती विस्तृतरित्या कधीच उपलब्ध करण्यात आली नाही.

  कोका कोलाचा शोध लागून आता १३४ वर्षे उलटली तरी अजून काही निवडक लोकांना हे पेय बनविण्याचा फॉर्म्युला (सूत्र) माहिती आहे.

  इतकेच नव्हे तर कोका कोला बनविण्याचा फॉर्म्युला एका कागदावर लिहून तो कागद अमेरिकेतील अटलांटा शहरात एका तिजोरीमध्ये सुरक्षितरित्या जतन करून ठेवण्यात आला आहे.

  आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्या आजूबाजूला अगदी सहजतेने उपलब्ध होणाऱ्या कोका कोला पेय बनविण्याचा फॉर्म्युला इतका गुप्त कसा असू शकतो. तसेच ह्याचे कारण काय असावे. चला तर जाणून घेऊया.

  १८८६ साली डॉ. जॉन एस. पेम्बर्टन याने कोका कोलाचा शोध लावला. त्यावेळेला पेय बनविण्याचा फॉर्म्युला गुपित ठेवण्यात आला. काही निवडक लोकांना माहित असणारा हा फॉर्म्युला कुठेही लिहून ठेवण्यात आला नव्हता.

  १८९१ साली आसा कॅन्डलरने कोका कोला कंपनीचे सर्व हक्क विकत घेतले.
  पुढे १९१९ साली अर्नेस्ट वुड्रफ आणि अन्य काही गुंतवणूकदारांनी कॅन्डलरकडून कोका कोला कंपनी विकत घेतली.
  कंपनी विकत घेताना अर्नेस्टने कर्जासाठी तारण म्हणून तो फॉर्म्युला न्यू यॉर्क शहरातील एका बँकेला देऊ केला. बँकेने तो फॉर्म्युला एका कागदावर लिहून घेऊन आपल्या सुरक्षा कक्षात व्यवस्थित सांभाळून ठेवला.

  पुढे १९२५ साली कर्ज फेडल्यानांतर बँकेकडून तो फॉर्म्युला परत घेऊन सुरक्षितरित्या जपून ठेवण्याची अर्नेस्टने व्यवस्था केली.
  २०११ साली तो फॉर्म्युला अटलांटा शहरातील वर्ल्ड ऑफ कोका कोलामध्ये हलविण्यात आला.

  आधी म्ह्टल्याप्रमाणेच एका वेळेला कोका कोला कंपनीतील काही निवडक लोकांना फॉर्म्युला माहिती असतो. असे बोलले जाते कि त्या सगळ्यांना एकाच विमानातून प्रवास करण्यास कंपनी कधीच परवानगी देत नाही. तसेच त्या पैकी प्रत्येक माणसाला फॉर्म्युल्याचा थोडासा भाग माहित असतो.

  कोका कोला कंपनीने यापैकी काही गोष्टीना दुजोरा दिला आहे. असे असले तरी नक्की किती लोकांना तो फॉर्म्युला माहित आहे किंवा इतर कोणतीही माहिती विस्तृतरित्या कधीच उपलब्ध करण्यात आली नाही.

  कोका कोलाचा फॉर्म्युला गुपित ठेवण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तो कंपनीसाठी खूप किमती आहे. त्याशिवाय त्याच्याभोवती एक रहस्यमय वलय निर्माण करून ग्राहकांमध्ये पेयाची लोकप्रियता वाढविण्याचा कोका कोलाचा प्रयत्न असावा.

  असे जरी असले तरी कोका कोलाच्या फॉर्म्युलयामध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. पेयामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाल्यामुळे १९०४ साली कॅफेनचे अंश त्यातून काढून टाकण्यात आले.

  १९८० सालापर्यंत कोका कोला बिट आणि उसापासून बनविलेल्या साखरेचा उपयोग करायची पण पुढे ती बदलून कमी किमतीची साखर वापरली जाऊ लागली.

  कोका कोलामध्ये खालील घटक वापरले जात असावेत असे मानले जाते.

  कोका झाडाची पाने, चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य, साखर, लिंबाचा रस, व्हॅनिला आणि कारमेल. तसेच संत्रा, लिंबू, जायफळ, धणे, नेरोली आणि दालचिनी काही प्रमाणात मिसळली जात असावीत.