ओल्या नारळाचं मिल्कशेक वाढवेल रोगप्रतिकारशक्ती; चविष्टही आणि त्वचाही बनवते तजेलदार

सध्या गर्मीचा सिझन सुरू झाला आहे. आणि अशात काही थंड आणि चविष्ठ प्यायला मिळालं तर आणखी कय हवं. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक गोष्टी खाऊन पाहतो. पण पदार्थ तितकाच चविष्ठ आणि हेल्थी असेल तर खाण्यात आणखीच मजा येते. सध्या गर्मीचा सिझन सुरू झाला आहे. आणि अशात काही थंड आणि चविष्ठ प्यायला मिळालं तर आणखी कय हवं. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  नारळात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. नारळाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, नारळातील फायबर देखील त्वचा सुंदर बनवते. दुधाचा मधुर शेक बनवून तुम्ही ते पिऊ शकता. त्यामुळे चवीसोबत रोगप्रतिकारशक्तीही टिकून राहते. चला जाणून घेऊया कोकोनट मिल्क शेक कसा बनवायचा.

  नारळ मिल्क शेक

  १ कप किसलेले ताजे नारळ

  २ कप दूध

  1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

  4-6 बर्फाचे तुकडे

  कोकोनट मिल्क शेक कसं बनवायचा:

  सर्व प्रथम ग्राइंडरच्या भांड्यात नारळ, दूध, व्हॅनिला इसेन्स आणि बर्फाचे तुकडे तर हवे असल्यास थोडी साखरही घालू शकता, बारीक करून घ्या.

  एका ग्लासमध्ये शेक काढा.

  कोकोनट मिल्क शेक तयार आहे.

  कधीही हा पदार्थ तुम्ही पिऊ शकता.