
साहित्य :
- १ किलो गव्हाचं पीठ
- ४५० ग्रॅम तूप
- ४५० ग्रॅम गूळ बारीक चिरलेला
- २ वाटी किसलेले सुकं खोबरं
- ३ कप बारीक केलेलं खारीक
- ७-८ वेलचीचे दाणे
- २ कप बारीक केलेले बदामाचे तुकडे
- २ कप बारीक केलेले काजूचे तुकडे
- दीड वाटी मनुके
- १ वाटी हालिम
- ४ टेबलस्पून खसखस
- ४ टेबलस्पून रवा
- २ वाटी डिंक
- २ वाटी मेथीचे दाणे
- दीड ते दोन ग्लास पाणी
कृती :
सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मेथीचे दाणे, हालिम, सुखं खोबरं, खसखस, रवा हलका भाजून घ्या. कढई मध्ये तीन ते चार टेबलस्पून तूप गरम करून करून डिंक सुद्धा भाजून घ्या. ( कोणताही पदार्थ भाजताना किंवा तळताना जळणार नाही याची काळजी घेऊन मंद आचेवर पदार्थ भाजा) यानंतर एका कढईमध्ये उरलेलं सगळं तुप घालून गरम करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून गव्हाचे पीठ छान ब्राऊन होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या.
मिक्सरमध्ये मेथीचे दाणे, वेलची वाटून घ्या. भाजलेले गव्हाचे पीठ एका परातीत काढा. त्यामध्ये बाकीचे सर्व भाजलेले साहित्य मिक्स करा. यात तुम्ही मनुके, खारीक पावडर, बारीक केलेले ड्रायफुट्स ॲड करा. सर्व साहित्य एकत्रित करून घ्या. एका भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करून त्यात गूळ घाला. गुळाचा पाक तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये एक चमचा तूप घाला. पाकामध्ये तयार एकत्रित मिश्रण घाला. पाकात जितके मावेल तितकेच मिश्रण घाला. चमच्याने ढवळत सगळे मिश्रण पाकात एकजीव करून घ्या. मिश्रण एका मोठया परातीत काढा. हातानं सगळे मिश्रण छान एकजीव करून घ्या. मिश्रण गरम असतानाच त्याचे छान लाडू वळून घ्या. अशा प्रकारे मेथीचे लाडू तयार!