नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये झटपट करू शकता Khandvi , जाणून घ्या Recipe

Khandvi Recipe : खांडवी, गुजरातच्या सुप्रसिद्ध डिशेसपैकी एक आहे. ही अतिशय चविष्ट असते. तथापि, खांडवी बनवणं थोडं कठीण काम आहे, पण आज मायक्रोवेव्हमध्ये आपण ही मिनिटात तयार करू शकतो. जाणून घेऊया ती तयार करण्याची रेसिपी

    Khandvi Recipe : खांडवी गुजराती खाद्यपदार्थाचाच एक भाग आहे. चवीला अतिशय स्वादिष्ट असते खांडवी (Khandvi). ती तयार करणं थोडं कठीण काम आहे, जी तुम्ही मिनिटांत तयार करून स्वादिष्ट चव चाखू शकता. तर जाणून घेऊया कशाप्रकारे मिनिटांत मायक्रोवेव्ह मध्ये खांडवी (Khandvi) कशी तयार केली जाते.

    खांडवी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

    ३/४ कप बेसन
    ३/४ कप दही
    १/४ टीस्पून आले पेस्ट
    १/४ टीस्पून हिरवी मिर्ची पेस्ट
    १/४ टीस्पून हळद पावडर
    एक चिमूटभर हिंग
    पाणी आवश्यकतेनुसार

    तडका देण्यासाठी :

    ३-४ कढीपत्त्याची पाने
    १ टीस्पून मोहरी
    १ टेबलस्पून खोबरे
    कोथिंबीर आवश्यकतेनुसार
    मीठ चवीनुसार
    १ टेबलस्पून तेल

    खांडवी तयार करण्याची कृती :

    १. सर्वप्रथम एका भांड्यात दही, बेसन, आल्याची पेस्ट, हिरव्या मिर्चीची पेस्ट, हळद पावडर आणि मीठ टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
    २. मायक्रोवेव्ह प्रीहिट करण्यासाठी ठेवा.
    ३. आता बेसनाचे मिश्रण मायक्रोवेव्ह सेफ बाऊल टाकून ते जवळपास ५ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करण्यासाठी ठेऊन द्या. लक्षात ठेवा, मध्येच एकदा हे मिश्रण ढवळा.
    ४. ५ मिनिटांनंतर बाऊल मायक्रोवेव्ह मधून काढा.
    ५. एक भांडे किंवा किचन ओटा स्वच्छ करून त्यावर हे मिश्रण पसरा.
    ६. ४-५ मिनिटांनंतर मिश्रण थंड होऊन घट्ट होईल. घट्ट झालेलं मिश्रण चाकूने रुंद पट्ट्या कापून घ्या.
    ७. पट्ट्या गोल करून रोल तयार करा.
    ८. आता मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये तेल, मोहरी, हिंग, कढीकत्ता टाकून २ मिनिटे मायक्रोवेव्ह करा.
    ९. तडका खांडवीवर टाका.
    १०. तयार आहे गुजराती खांडवी, खोबरे आणि कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा.