दावणगिरी लोणी डोसा तुम्हालाही आवडतो का? अगदी सोप्या पद्धतीने बनवा घरच्या घरी मऊ, जाळीदार दोसा!

काही खास ट्रिक वापरुन तुम्ही मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा घरीही बनवू शकता.

  दोसा म्हण्टलं (Dosa) की समोर येतो तव्यावार गरम गरम बनणारा दोसा आणि आंबटगोट सांबर आणि नारळाची चटणी. दोसा हा पदार्थ फक्त दाक्षिणात्या राज्यापुरता मर्यादित राहिला नसून तो देशभरात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. त्यातही साधा दोसा, रवा डोसा असे अनेक प्रकार  खवय्यांचे फेव्हरेट आहेत. त्यातही अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा  डोसाचा एक प्रकार म्हणजे दावणगिरी डोसा. (Davangiri Loni Dosa Recipe) हल्ली रस्त्यावर अनेक ठिकाणी दावणगिरी पद्धतीचा डोसा मिळण्याचं ठिकाणं जागोजागी सुरू झालेले तुम्ही पाहिले असेलच.

  हा स्पंजसारखा मउ डोसा खायला जर तुम्हाला आवडत असेल तर, त्याची रेसिपी अगदी सोपी आहे. काही खास ट्रिक वापरुन तुम्ही मस्त मऊसूत, चवदार आणि खरपूस दावणगिरी पद्धतीचा डोसा घरीही बनवू शकता. जाणून घ्या त्याची रेसिपी

   साहित्य :

  १/२ वाटी साबुदाणे
  १/२ वाटी उडिद डाळ
  १ वाटी जाडे पोहे
  ४ वाट्या तांदूळ
  १५-२० मेथीचे दाणे
  हे प्रमाण साधारण ३-४ जणांकरीता डोसे होतील इतके आहे.

  कृती :

  वरील सर्व साहित्य कमीत कमी ५ तास भिजत ठेवणे. त्यानंतर हे भिजवलेले धान्य त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणे. लक्षात ठेवा हे मिश्रण जराही रवाळ रहाता कामा नये.मिश्रण तयार झाल्यावर त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा , चवीनुसार मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवावे.

  डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे. इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआप पसरले जाईल. डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही.

  डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा. डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो या रेसिपी करीता पांढरे लोणी वापरावे. वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा हलका सोनेरी आणि चॉकलेटी रंग दिसेल. त्यांनतर लगेचच डोसा काढून गरमागरम चटणी किंवा सांबार याबरोबर सर्व्ह करावा.