gulpoli

सण म्हटला की गोड पदार्थ हा आलाच. महाराष्ट्रात (Festivals Of Maharashtra) काही सणांना विशिष्ट गोड पदार्थ हेे आवर्जून बनवले जातात. मकर संक्रांत (Makar Sankranti 2022) आली की तिळगुळ आणि गुळपोळी हे दोन पदार्थ तर स्त्रिया घरी तयार करतात. संक्रांतीनिमित्त आज शिकूया, गुळाच्या पोळीची (Gulpoli) रेसिपी.

    साहित्य – अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, ७-८ वेलचीची पूड, १ डावभर खसखस,१ डावभर डाळीचे पीठ, अर्धा किलो कणीक, अर्धी वाटी तेल

    कृती – गुळ किसणीवर किसून घ्यावा. सुके खोबरे, तीळ, खसखस भाजून मिक्सरमध्ये वाटून किसलेल्या गुळात घालावे.
    डाळीचे पीठ तेलावर भाजून या मिश्रणात मिसळावे. वरून वेलचीची पूड घालून सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे पुरीच्या गोळीएवढे गोळे बनवावेत. कणकेमध्ये अर्धी वाटी तेल घालून नेहमीच्या कणकीप्रमाणे भिजवावी. त्याचे पुरीएवढे २ गोळे घेऊन त्या लाट्याच्या मध्ये गुळाचा एक गोळा घालून सर्व बाजू नीट बंद करावे व हळूहळू पोळी लाटावी.तव्यावर तेल किंवा तूप लावून मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजावी. वरून तुपाची धार लावून गरमागरम गुळाची पोळी खाण्यास द्या.