nashik chivda

दिवाळी जवळ आली. तुमची फराळाची तयारी झाली का ? यंदा वेगळा चिवडा करुन बघायचाय का? मग नाशिक चिवड्याची ही रेसिपी(nashik chivda recipe) वाचा आणि घरी ट्राय करुन बघा. तुमच्या फराळाची लज्जत आणखी वाढेल.

दिवाळी जवळ आली. तुमची फराळाची तयारी झाली का ? यंदा वेगळा चिवडा करुन बघायचाय का? मग नाशिकच्या चिवड्याची ही रेसिपी(nashik chivda recipe) वाचा आणि घरी ट्राय करुन बघा. तुमच्या फराळाची लज्जत आणखी वाढेल.

साहित्य : – अर्धा किलो भाजके पोहे, अर्धा कप डाळ, खोबऱ्याचे काप, १ कप शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला कांदा, अर्धा कप काळा मसाला, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ, ७ – ८ आमसुलं, धने-जिरे पूड, पिठीसाखर, बारीक चिरलेला लसूण, २ चमचे आल्याचा कीस, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य.

कृती : – तेल तापवून त्यात कांदा लालसर तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या. आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा. (आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला परता. धने-जिरे पूड, थोडी लवंग, दालचिनीची पूड घाला. गॅस बंद करून, पोहे घालवून कालवा. तळलेला कांदा हाताने चुरून मिसळा. हा चिवडा अतिशय खमंग लागतो.