On the island of Hormuz in Iran, soil and sand are added to the meal, not salt

मीठ आणि मसाल्यांमुळे खाद्यपदार्थांना चव येते. मीठ नसेल तर कितीही काहीही घाला, त्या पदार्थांना मुळीच चव येत नाही. पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे खाद्यपदार्थांत मसाले आणि मीठ टाकण्याऐवजी वाळू आणि माती टाकली जाते. ही अजब प्रथा इराणमधील होर्मुझ नावाच्या बेटावर पाळली जाते. खाद्यपदार्थांत माती आणि वाळू घातली जाते(On the island of Hormuz in Iran, soil and sand are added to the meal, not salt ).

    याला इंद्रधनुष्य बेट असेही म्हणतात. कारण इथली माती आणि वाळू विविधरंगी आहे. एवढेच नव्हे तर इथले पर्वतदेखील इंद्रधनुष्याच्या रंगासारखे दिसतात. इथल्या डोंगरांतही मीठ आहे. त्यामुळे इथले लोक अन्नपदार्थांत वेगळे मीठही वापरत नाहीत. त्यांच्या जेवणात मीठ किंवा मसाले न घालता माती आणि वाळू घातली जाते. असे पदार्थ ते अतिशय आवडीने खातात.

    अशा पदार्थांत माती आणि वाळू टाकण्याचे काय कारण असेल? असा प्रश्न पडतोच. या बेटावरील माती आणि वाळूमध्ये भरपूर मीठ, लोह आणि इतर खनिजे असतात. ही सर्व खनिजं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे इथले लोक जेवणात या वाळूचा आणि मातीचा वापर करतात. मात्र कोणत्याही अन्नपदार्थांत इथली माती किंवा वाळू घालण्यापूर्वी, ती पूर्णपणे स्वच्छ केली जाते आणि मगच पदार्थांत घातली जाते. अशी माती किंवा वाळू घालून बनवलेले इथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत.

    विशेषत: माशांपासून बनवलेले पदार्थ अधिक प्रसिद्ध आहेत. येथे गोड्या पाण्यातील सार्डिन, किल्का आणि मोमाघ असे मासे मिळतात. त्यांना संत्र्याच्या सालीने मॅरिनेट केले जाते आणि नंतर वाळू, चिकणमातीपासून बनवलेले विशेष मसाले लावले जातात. नंतर दोन दिवस हे मासे उन्हात सुकवले जातात. त्यानंतर, त्यापासून इथला सर्वात प्रसिद्ध असा ‘सुराघ’ हा खास पदार्थ तयार होतो. जगभरात या पदार्थाची ख्याती पसरली आहे. येथे येणारे पर्यटकही याचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाहीत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022