उपाशी पोटी चहा पिण्याची सवय अत्यंत हानिकारक; होतात भयानक दुष्परिणाम

चहा पिणे ही एक प्रथा बनली आहे. भारतातील 90 टक्के लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. परंतु चहा पिणे आरोग्यासाठी कितपत चांगले आहे ? चहातील टॅनिन शरीराला तात्पुरती उर्जा देत असले तरी आरोग्यासाठी टॅनिन हानिकारक आहे. काळ्या चहात दूध मिसळ्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात(The habit of drinking tea on an empty stomach is extremely harmful; Terrible side effects occur).

  मळमळ वाटणे

  चहात मोठ्या प्रमाणात अॅसिड असते. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने पोटातील पाचक रसावर थेट परिणाम पडतो. उपाशी पोटी चहा पिल्याने पित्त वाढून मळमळ वाटते. म्हणून अनेकांना सकाळी चहा पिणे आवडत नाही.

  थकवा जाणवणे

  थकल्यावर उत्साह वाढवण्यासाठी आपण चहा पितो. परंतु एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक उपाशी पोटी अधिक दूध असलेला चहा पितात त्यांना लवकर थकवा जाणवतो.

  पोटातील अल्सर

  उपाशी पोटी कडक चहा पिल्याने पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते.

  प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता

  जे पुरुष दिवसात पाच कप चहा पितात त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते.

  खूप गरम चहा पिण्याचे नुकसान

  ब्रिटिश मेडीकल जर्नलमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार खूप गरम चहा पिण्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. कडक, गरम चहा गळ्यातील टिश्यूसाठी नुकसानकारक असतो.

  हे सुद्धा वाचा
  • 2022