बाजारातून महागडी Protin Powder विकत घेण्याची गरजच नाही, पिळदार शरीरयष्टीसाठी घरीच तयार करा Desi Protin

घरच्या घरीच नैसर्गिक पद्धतीने प्रोटीन पावडर (Natural Protin Powder At Home) तयार करता येवू शकेल. घाबरू नका याला फार खर्चही येणार नाही.

  आजच्या तरुणांना आपणही फिट (fit) असावं म्हणून त्यासाठी वाट्टेल ते उपाय करण्याची एक नशाच चढली आहे. हेही एक कारण आहे की, यामुळे तरुणाई (Youngsters) जिममध्ये (Gym) जावून तासनतास घाम गाळताना पाहायला मिळते. तर यापैकीच काही लोक हे जिम केल्यानंतर प्रोटीन पावडर (Protin Powder) घेऊन तिचं सेवन करतात. तर काही लोकांचं एवढं बजेट (Budget) नसतं की ते प्रोटीन पावडर घेऊ शकतील. तर काही लोकांना प्रोटीन पावडर घेणं धोकादायक (Dengerous) वाटतं म्हणून ते प्रोटीन पावडर घेत नाहीत त्यामुळे त्यांच्यात सतत हीच चर्चा सुरू असते की, जीम केल्यानंतर प्रोटीनची ही कमतरता कशी भरून काढावी.

  जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर प्रसिद्ध न्युट्रिशियन एकता सूद यांनी नवभारत टाइम्स.कॉमला अशीच पद्धत सांगितली आहे ज्याच्या माध्यमातून घरच्या घरीच नैसर्गिक पद्धतीने प्रोटीन पावडर (Natural Protin Powder At Home) तयार करता येवू शकेल. घाबरू नका याला फार खर्चही येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीन पावडर तयार करण्याची पद्धत आणि ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे जिन्नस.

  प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • १० ते १५ मखाने
  • १० बदाम
  • २ अक्रोड
  • १ छोटा चमचा बडीशेप
  • १ छोटा चमचा खडीसाखर
  • २ वेलची
  • २ केशर काड्या
  • १ चिमूटभर काळी मिरी
  • एक चमचा मिक्स बिया

  प्रोटीन पावडर तयार करण्याची कृती

  सर्वप्रथम बदाम आणि मखाना चांगला भाजून घ्या
  हे थंड झाल्यावर इतर साहित्य चांगलं कुटून घ्या
  कुटून झाल्यावर ही पावडर एका सीलबंद डब्यात भरून ठेवा
  एक ग्लास दुधात छोटा चमचा प्रोटीन पावडर मिक्स करा आणि प्या. यानंतर तुमचे मसल्स हळू-हळू वाढताना दिसतील.

  नैसर्गिक प्रोटीन पावडरचे फायदे

  सर्वांनाच ठाऊक आहे की, आज बाजारात शेकडो प्रोटीन पावडर उपलब्ध आहेत. कोणास ठाऊक त्यात काय-काय मिसळलेलं असतं. यासोबतच त्यात साखरेचं प्रमाणही अधिक असतं अशा परिस्थितीत घरी तयार केलेली प्रोटीन पावडर तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकते. तिला अधिक चांगली आणि उत्तम चव यावी म्हणून या प्रोटीन पावडरमध्ये तुम्ही कोको पावडरही मिक्स करू शकता.

  बदाम

  बदाम हे असं ड्रायफूट आहे ज्यात फक्त प्रोटीनच नाही तर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. १०० ग्रॅम प्रोटीनमध्ये जवळपास २१.५ ग्रॅम प्रोटीन असतं.

  मखाना

  मखानाची गणना एक सर्वाधिक स्वस्थ स्नॅक्स म्हणून केली जाते. यात आपल्याला मॅग्नेशियम, फॉस्फरस, मँगनीज, पोटॅशियम आणि प्रोटीनसारखी पोषणमूल्ये असतात. सोबतच मखान्यात कॅलरीजही कमी असतात. म्हणून वजन घटविण्याच्या कामीही हा महत्त्वाची भूमिका बजावतो.

  अक्रोड

  अक्रोडही प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत मानला गेला आहे. पाऊण कप अक्रोडमध्ये आपल्याला ४.५ ग्रॅम प्रोटीन असतं. याशिवाय हे हृदयासाठीही फायदेशीर ठरतं. सोबतच याला ओमेगा-३ फॅटी ॲसिडचाही एक चांगला स्त्रोत मानलं जातं.

  या प्रोटीन पावडरमध्ये वापरण्यात आलेले जिन्नस पूर्णपणे सुरक्षित आहेत. पण तुमचं एखादं औषध किंवा काही उपचार सुरू असतील तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.