लाइटभोवती फिरणाऱ्या किड्यांपासून अशी मिळवा सुटका

आठवड्यातून 3 वेळा व्हिनेगरच्या पाण्याने बल्ब, फॅन पुसून घ्या. यासाठी एका बादलीत एक चमचा लिंबाचा रस..

  पावसाळा सुरु झाला की संध्याकाळच्या घरात किडे, डास यायला सुरुवात होते. यात खासकरुन हे किडे लाईट, बल्बभोवती सतत पिंगा घालतात. त्यामुळे घरात व्यवस्थित प्रकाश येत नाही. सोबतच त्यांची सतत किरकिरही कानावर येते. त्यामुळे पावसाळ्यात लाईटवर कोणत्याही प्रकारचे किडे बसू नयेत यासाठी कोणते उपाय करता येतील ते आज आपण जाणून घेऊया.

  १. खिडक्या लवकर बंद करा
  साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डास,किडे घरात येतात. त्यामुळे अशा वेळी शक्यतो संध्याकाळी लवकरच दारंखिडक्या बंद कराव्यात. तसंच खिडकीजवळ जास्त झाडं लावू नयेत. रात्री घराबाहेरील लाईट चालूच ठेवायचा असेल तर मुख्य दरवाजा लवकर बंद करा. कारण लाइटभोवती फिरणारे कीडे घरात येऊन घरातील दिव्यांभोवतीही फिरतात.

  २. होममेड मेणबत्त्या लावा
  संध्याकाळी दारं-खिडक्या लावल्यानंतर घरात होममेड मेणबत्त्या लावाव्यात. तसंच होममेड मेणबत्त्या तयार करताना त्यात पेपरमिंट आणि लव्हेंडर ऑइल नक्कीच मिक्स करा. घरात काही वेळ या मेणबत्त्या पेटवा आणि त्यानंतर घरातील सगळे लाईट्स चालू करा. तसंच घरात कडुलिंबाचा वाळलेला पालादेखील जाळू शकता व धूपाप्रमाणे त्याचा वापर करु शकता.

  ३. काही काळासाठी लाईट बंदच ठेवा
  एकदा लाइटभोवती किडे फिरू लागले की ते लवकर जात नाहीत. त्यामुळे असा वेळी काही काळासाठी लाइट बंद करुन ठेवा व दरवाजे, खिडक्या उघडा. लाइट बंद केल्यामुळे हे किडे बरोबर घराबाहेर अन्य प्रकाशाच्या दिशेने जातात. तसंच घरात झेंडूच्या फुलांचा पुष्पगुच्छा ठेवा. या फुलांच्या वासामुळेही किडे येत नाहीत. किंवा, लसूण वा तुळशीची पानं घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा.

  ४. होममेड एअर फ्रेशनर
  किडे,डास यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी होममेड एअर फ्रेशनरचा वापर करा. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि एसेंशिअल ऑइल (लेमन,युकेलिप्टस, सिट्रोनेला) मिक्स करा. त्यानंतर हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरा व रुम फ्रेशनरप्रमाणे घरातील कोपरे, खिडक्या यांठिकाणी मारा.

  ५. व्हिनेगर
  आठवड्यातून 3 वेळा व्हिनेगरच्या पाण्याने बल्ब, फॅन पुसून घ्या. यासाठी एका बादलीत एक चमचा लिंबाचा रस, 1 कप व्हिनेगर मिक्स करा