ग्रीन टीचा असा ही वापर साैंदर्यासाठी केला जातो; नक्की वाचा

    चेहरा (face) हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. सध्याच्या घडीला प्रदूषणामुळे आपला चेहरा खूप खराब होतो. अशावेळी आपण साधेसोपे उपाय केले तर आपल्या चेहरा (face) नक्कीच खुलेल. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले फेस स्क्रब तुमच्या त्वचेसाठी सर्वात उपयुक्त आहेत. त्यामुळेच याकरता तुमच्या खिशालाही फार खर्च येणार नाही. यामुळेच त्वचेला चकाकी सुद्धा येईल.

    आपण ग्रीन टी (green tea) आणि टोमॅटो (tomato) सारख्या घटकांपासून बनवलेले फेस स्क्रब (face) त्वचेसाठी (skin) वापरू शकतो. स्क्रबिंग आपल्या त्वचेच्या काळजी दिनक्रमाचा एक आवश्यक भाग असावा. कारण त्यामुळे मृत (dead) पेशी काढून टाकण्यात मदत होते. तसेच पुरळ होण्याचे प्रमाण कमी होते. स्क्रबिंग करण्यामुळे आपल्या त्वचेचे रक्ताभिसरणही उत्तम होते. तसेच रंध्रे सुद्धा मोकळी झाल्याने त्वचेला एक चकाकी प्राप्त होते.

    टोमॅटोमध्ये (tomato) लाइकोपीन, अल्फा आणि बीटा-कॅरोटीन, एस्कॉर्बिक एसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतात. तसेच अँटीऑक्सिडेंट आहे. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यास मज्जाव करते. तसेच टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. यामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या कमी पडतात. टोमॅटोमुळे त्वचेची छिद्र साफ होतात, तसेच त्वचेचा तेलकटपणाही खूप कमी होतो. तेलकट त्वचेमुळे मुरमाची समस्या वाढते.

    ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूपच मदत होते. तसेच हे गुणधर्म छिद्रांना अनलॉक करू शकतात.

    ग्रीन टी बॅग १ (green tea), टोमॅटो १(tomato) ,ऑलिव्ह तेल १(olive oil)चमचा टोमॅटो मॅश करून पेस्ट बनवा. आता मॅश केलेल्या टोमॅटोमध्ये ग्रीन टी आणि ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण कमीतकमी १० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर या फेस स्क्रबने हळूवारपणे आपला चेहरा आणि मानेवर मसाज करावे. किमान हा स्क्रब १० ते १५ मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर आपला चेहरा आणि मान कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा ग्रीन टी आणि टोमॅटो फेस स्क्रब वापरा.