वाढवा दाढी, बांधा माडी, जाणून घ्या दाढी राखण्याचे फायदे, लांब दाढीचे पुरुष बायकांना आवडतात, दीर्घायुष्यही मिळते आणि या मोठ्या आजारापासूनही होते सुटका

दाढी (Beard) राखणारे पुरुष आकर्षक तर दिसतातच पण त्याचबरोबर त्याचा आणखी एक फायदा म्हणजे, अनेक आजारांपासून वाचवण्यासाठीही दाढी राखणे (Keep Beard) हे उपयुक्त ठरु शकते. या रिसर्चमध्ये समोर आले आहे की, ज्या पुरुषांची दाढी वाढलेली असते, असे पुरुष महिलांना जास्त आवडतात. तसेच लांब दाढी असणारे पुरुष दीर्घायुषी असतात आणि त्यांचे लैंगिक जीवनही (Sex Life) समाधानकारक असते.

    नवी दिल्ली : काही पुरुषांना दाढी वाढवणे (Grow a Beard) चांगलेच आवडते. सध्या महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात दाढी वाढवण्याची (Grow a Beard) फॅशन चांगलीच रुळली आहे. काही जणांना मात्र दाढी वाढविणे अजिबात आवडत नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की दाढी राखल्याने (Keep Beard), तुमच्या अनेक समस्या तुम्ही दूर करु शकता. एका अभ्यासाच्या निष्कर्षात हे समोर आले आहे.

    अभ्यासाचा निष्कर्ष काय

    दाढी (Beard) राखणारे पुरुष आकर्षक तर दिसतातच पण त्याचबरोबर त्याचा आणखी एक फायदा म्हणजे, अनेक आजारांपासून वाचवण्यासाठीही दाढी राखणे (Keep Beard) हे उपयुक्त ठरु शकते. या रिसर्चमध्ये समोर आले आहे की, ज्या पुरुषांची दाढी वाढलेली असते, असे पुरुष महिलांना जास्त आवडतात. तसेच लांब दाढी असणारे पुरुष दीर्घायुषी असतात आणि त्यांचे लैंगिक जीवनही (Sex Life) समाधानकारक असते. हेही निष्कर्ष समोर आले आहेत. वैज्ञानिकांनी लांब दाढी राखण्याचे अनेक फायदे (Keep Long Beard Benefits) सांगितले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे त्वचेच्या कॅन्सरपासून (Protect From Skin Cancer) बचाव करण्यात दाढी महत्त्वाचे कार्य करते.

    लांब दाढी वाचवते त्वचेच्या कॅन्सरपासून

    ऑस्ट्रेलियाच्या क्वीसलेंड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, नुकसानकारक अल्ट्रा व्हॉयलेट रेंजपासून, दाढी पुरुषांचे संरक्षण करते. दाढीमुळे ९० टक्के संरक्षण वाढते. त्यामुळे दाढी राखणाऱ्यांना त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.चेहऱ्यावर आणि मानेवर विशिष्ठ पॅच बनण्यापासून बचाव होऊ शकतो. दाढी सनक्रीन प्रमाणे सूर्यकिरणांपासून वाचवू शकत नसली, तरी युव्ही किरणांपासून मात्र चेहऱ्याचा नक्की बचाव करु शकते. त्यामुळे दाढी राखणाऱ्या पुरुषांना इतरांच्या तुलनेत सनस्क्रीम वापरण्याची गरज कमी असते. सूर्याच्या हानीकारक युव्ही किरमांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.