
जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितललेलं आहे. हा योग अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो.
Gurupushyamrit Yoga: आज 25 मे रोजी गुरुपुष्यामृत (Gurupushyamrit Yoga) योग आहे. डिसेंबरमध्ये हा योग पुन्हा येणार आहे. या योगासह आणखी 5 शुभ योग (Auspicious day ) आज आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग याच दिवशी तयार झाले आहेत. आजच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य, खरेदी कराल तर त्यात अनेक पटींनी वाढ होईल असं म्हटलं जातं. मात्र, लग्नाशिवाय इतर कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू शकता. या मुहूर्तावर कोणत्या वस्तूंची खरेदी करू शकता हे जाणून घेऊ.
गुरुपुष्यामृत योग, किती काळ
सूर्योदयापासून ते संध्याकाळी 5.54 पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. संध्याकाळी 5.54 नंतर आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे संध्याकाळी 5.54 पर्यंत तुम्ही कोणत्याही शुभ वस्तूंची खरेदी करू शकता.
लग्न वगळता इतर कोणतेही शुभ कार्य करू शकता.
गुरुपुष्यामृत योगासह 5 शुभ योग
गुरु पुष्य योगासह आणखी 5 शुभ योग आज तयार होत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वृद्धी योग आहे. अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील सकाळी
5.26 पासून संध्याकाळी 5.54 पर्यंत आहे. रवीयोग सकाळी 5.26 ते संध्याकाळी 5.54 पर्यंत आहे. रात्री 9.12 ते दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी सकाळी 5.25 पर्यंत आहे.
गुरु पुष्य योगात या 5 शुभ गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता.
1. सोने – सोनं हे सुख-समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगात सोनं खरेदीला विशेष महत्व आहे. यामुळे तुमचे धन आणि संपत्ती वाढते असं म्हटलं जातं.
2. हळद – गुरुचा रंग पिवळा आहे आणि हळदीचा रंगही पिवळा आहे. हळद शुभ प्रतीक आहे. त्यामुळे हळद खरेदीही शुभ मानली जाते.

3. हरभरा डाळ – हरभऱ्याची डाळ गुरुग्रहाच्या पूजेत वापरली जाते. त्यामुळे हरभरा डाळ खरेदी करू शकता. हळद, हरभरा डाळ याशिवाय पिवळ्या रंगाचे कपडे, पितळ, तूपसुद्धा खरेदी करू शकता.
4. सोन्याचं नाणं – गुरु पुष्य योगाच्या दिवशी सोन्याचं नाणं किंवा चांदीचं नाणं खरेदीला विशेष महत्त्व आहे.
5. धार्मिक पुस्तकं – धार्मिक पुस्तक खरेदीलाहा गुरुपुष्यामृत योगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योगात बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही धार्मिक पुस्तकंही खरेदी करू शकता.
त्याचा तुम्हाला फायदाच होईल.