केस खूप कोरडे आहेत? केसांना सॉफ्ट आणि मुलायम ठेवण्यासाठी वापरा या २ गोष्टी

सतत तुटणारे केस, स्लिप्ट एंड, कोरड्या आणि रफ केसांचा तुम्हालाही त्रास होत असेल तर हे उपाय तुमच्यासाठी योगदान ठरतील. या टिप्स फॉलो करून तुम्ही सिल्की आणि स्मूथ केस मिळवू शकता.

  उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. केस गळणे, कोंडा होणे आणि कोरडेपणा या केसांच्या समस्या लोकांसाठी सामान्य बनल्या आहेत. या समस्यांची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर समस्या वाढू शकतात. केसांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली महागडी हेअर केअर प्रोडक्ट वापरत असाल तर तुमचा खर्च वाचवा आणि केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी हे हेअर मास्क एकदा तयार करून पहा. या दोन गोष्टींपासून हे हेअर मास्क घरी तयार करणे आणि लावणे खूप सोपे आहे. याच्या काही वापरातच तुम्हाला परिणाम दिसून येईल. हे हेअर मास्क लावल्याने तुम्हाला तुमचे केस सॉफ्ट आणि मुलायम केस जाणवतील. चला तर मग जाणून घ्या कोणते आहेत हे हेअर मास्क आणि ते कसे बनवायचे.

  पाहा हे हेअर मास्क कसे बनवायचे.

  एलोवेरा जेल
  एलोवेरा म्हणजेच कोरफड हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. एलोवेरा हे स्किनलासुद्धा तुकतुकीत ठेवण्याचे काम करते. तसेच हे केसांना कोंडापासून वाचवण्यासोबतच केसांना रेशमी ठेवतात. यामध्ये असलेले अमीनो ॲसिड आणि प्रोटीयोलाइटिक एन्झाईम केसांची मुळे मजबूत करतात. ते लावण्यासाठी कोरफडीचे पान घ्या. नंतर त्याचे जेल एका कपमध्ये काढून घ्या. त्यात दोन चमचे एरंडेल तेल मिक्स करा. आता त्याच प्रमाणात मेथी पावडर टाकून मिश्रण तयार करा. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण केसांची लांबी आणि टाळूवर नीट लावा. काही वेळ ठेवल्यानंतर शाम्पूने केस वैवस्थित धुवून घ्या.

   

  दही लावा
  दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक केसांच्या कूपांना मजबूत करते आणि हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. दह्याच्या वापराने केसांची मुळे मजबूत बनतात आणि कोंडाही दूर होतो. हे लावण्यासाठी एक कप दही घ्या. त्यात सुमारे दोन चमचे आवळा पावडर मिक्स करा. हे नीट मिक्स केल्यानंतर हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर नीट लावून घ्या. साधारण हे मिश्रण अर्धा तास राहू द्या. नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवून टाका. हे दोनी मिश्रण तुम्ही आठवड्यातून एक, दोन वेळा वापरून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल याचा वापर केल्यास केसांच्या अनेक समस्यासुद्धा दूर होतील.