जीवनसाथी निवडण्याच टेंशन येत आहे? मग ‘हे’ प्रश्न विचारा

  प्रेम, आकर्षणाच्या विश्वात एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती कसा आहे? हे कळणं फार महत्त्वाचं असतं. प्रेम संबंधात पहिली डेट ही खूपच खास असते. त्यामुळे पहिल्या भेटीमध्ये, डेटवर जात असाल तर सहाजिकच तुम्ही थोडेफार नर्व्हस असणं स्वाभाविक आहे. पहिल्या डेटवर नेमके कोणते कोणते प्रश्न विचारावेत? कसे वागावे? याबाबत अनेकजण सल्ले देत असतात.

   

  • तुमचा जोडिदार काय काम करतो याबाबत तुम्हांला कल्पना असेल पण त्याची भविष्यातील स्वप्न काय आहेत? कशाबाबत तडजोड करावी लागेल याचा तुम्हांला अंदाज येईल?
  • आवडता छंद कोणता? असे नेहमीचे प्रश विचारण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार पुस्तकं किंवा सिनेमा कोणता पहता?
  • तुमचा साथीदार शालेय जीवनात कसा होता हे नक्की जाणून घ्या?
  • तुमच्या साथीदाराला कोणत्या गोष्टीबाबत प्रेम, आकर्षण, पॅशन आहे?
  • लग्नानंतर दोघांचंही आयुष्य झपाट्याने बदलतं. त्यामुळे त्यांच्या साथीदाराच्या आयुष्यात असलेल्या व्यक्तींसह त्यांचा स्वीकार करावा लागतो?