2050 पर्यंत 250 कोटी लोक बहिरे होणार; हेडफोनमुळे श्रवणशक्तीवर होतोय भयानक परिणाम

फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मेडिकल इन्स्टिट्युटच्या संशोधनातून फ्रान्समध्ये चारपैकी एका व्यक्तीला ऐकताना त्रास होत असल्याचे आणि ते हळूहळू बहिरे होत चालल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ देशातील 25 टक्के लोकसंख्या यामुळे प्रभावित होत आहे(Headphones have a devastating effect on hearing).

    पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अशाप्रकारचे संशोधन व्यापक स्तरावर करण्यात आले असून यात 18-75 या वयोगटातील 1,86,460 लोकांना सामील करण्यात आले होते. पूर्वी केवळ लहान स्तरावर संशोधन करण्यात आले होते, परंतु यंदा करण्यात आलेल्या संशोधनानुसार लोकांना ऐकण्यात समस्या लाइफस्टाइल, सोशल आयसोलेशन आणि नैराश्य व गोंगाटाच्या संपर्कात आल्याने होत आहे.

    काही लोकांमध्ये मधूमेह आणि नैराश्यामुळे ऐकण्यास समस्या येत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे तर काही लोकांना एकाकीपणा, शहरी गोंगाट आणि हेडफोनच्या वापरामुळे हा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे 150 कोटी लोक कुठल्या न कुठल्या स्वरूपात श्रवणशक्तीतील समस्येला सामोरे जात आहेत. ही संख्या 2050 पर्यंत वाढून 250 कोटी होण्याची शक्यता आहे. याचमुळे याला आरोग्य समस्येच्या स्वरूपात पाहिले जात आहे.

    फ्रान्समध्ये श्रवणशक्तीची समस्या असलेल्यांपैकी केवळ 37 टक्के लोकच हियरिंग एडचा वापर करतात. धूम्रपान करणारे आणि बीएमआय अधिक असलेले लोक देखील हियरिंग एडचा कमी वापर करत आहेत. वाढती समस्या पाहता गेल्या वर्षी फ्रान्सच्या आरोग्य विभागाने मोफत हियरिंग एड लोकांना उपलब्ध केले होते. हियरिंग एडसाठी विम्याचीही तरतूद करण्यात आली आहे.