40 lakh left job and became a cleaning worker

एका महिलेने 40 लाखांची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि तिने सफाईचे काम करायला सुरुवात केली. क्लेअर बर्टन असे या महिलेचे नाव आहे. ती ब्रिटनची असून, क्लिनर होणे हे कॉर्पोरेट नोकरीमध्ये ईमेल लिहिण्यापेक्षा अगदी वेगळे जग आहे. तसेच हा निर्णय आपल्या करिअरचा सर्वात चांगला निर्णय होता, असे तिने म्हटले आहे(40 lakh left job and became a cleaning worker).

  माहितीनुसार, लाखो रुपयांची नोकरी सोडणारी क्लेयर बर्टन सध्या 6 ग्राहकांकडे सफाईचे काम करते. हे काम तिने इंस्टाग्राम युजर मिस हिंच यांच्या कडेपाहून निवडले. बर्टनने ऑगस्ट 2001 मध्ये हाय-स्ट्रीट बँकेसाठी ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची कमाई दीड लाख रुपये एवढी होती.

  याचदरम्यान तिने सप्टेंबर 2003 मध्ये बॉयफ्रेंड डेव्हसोबत लग्न केले. बर्टनचे 2017 मध्ये प्रमोशन झाले. यानंतर तिचा पगार सुमारे 40 लाख रुपये झाला. होता. पण त्याच वर्षी बर्टनच्या वडिलांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. एका वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये तिचे लग्नही तुटले तिचा घटस्फोट झाला. या सर्व प्रकाराने तिला मोठा धक्का बसला.

  क्लेअर बर्टन सांगते, ‘तेव्हा मला वाटले होते, की आता आयुष्य संपले. पुढचे अनेक महिने मी एकटीच होते. मात्र, एका गोष्टीची मला अनपेक्षितपणे मदत झाली आणि ती गोष्ट म्हणजे स्वच्छता. बर्टनने सांगितले की, ज्या कामाचा मला नेहमी तिरस्कार वाटत असे आणि जे काम मी इतरांकडून पैसे देऊन करून घेत होते, त्याच कामाने मला धीर दिला.

  कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात घरातून काम करताना बर्टनने साफसफाईचेही काम केली. यातून तिला आनंद मिळू लागला, यानंतर आपण हेच काम का करू नये? असे तिला वाटले. मग काय, बर्टनने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ क्लिनर बनली. आता ती केवळ स्वतःचे घरच नाही तर इतरांची घरेही स्वच्छ करते. तिच्याकडे आता सहा ग्राहक आहेत.

  हे सुद्धा वाचा