डोळ्याची नजर वाढविण्याचे जबरदस्त उपाय; प्रत्येकाने नक्की करावा

  डिजिटल युग हे जरी प्रगतीच्या दिशेने झेप घेत असले तरी ते आपल्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. आपला स्क्रीन टाइम वाढला असल्याने मोठ्याप्रमाणात डोळ्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. यात नजर कमजोर होणे ही समस्या अनेकांना भेडसावत आहे.

  आजकाल आपण पाहतो की, अगदी लहान वयाच्या मुलांनासुद्धा चष्मा लागलेला असतो. शिक्षणापासून ते पुस्तकांपर्यंत सवच गोष्टीं डिजिटल झाल्याने डोळ्यांवरचा ताण मोठ्याप्रमाणात वाढला आहे. यासाठी आज आम्ही तुम्हांला डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत.

  डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय :

  धन्याचे बी: धन्याचे बी बारीक वाटून त्याची पावडर करा. त्यामध्ये थोड्या प्रमाणात साखर एकत्र करून ठेवा. हे मिश्रण नियमीतपणे वापरा. यामुळे मोतीबिंदूसुद्धा बरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची  नजर वाढण्यास मदत होते.

  गाजराचा रस : ज्या लोकांना नजरेचा त्रास होतो. त्यांनी गाजराचा रस नियमीतपणे प्यावा. याने तुम्हांला लाभदायक परिणाम मिळतील.

  कोथिंबीर: कोथिंबीरच्या तिन्ही भागांना एकत्र करून साखर मिक्स करून ते मिश्रण एकजीव करून घ्या. ते बारीक वाटून घ्या. त्यानंतर ते उकळत्या पाण्यात एक तास पूर्णपणे झाकून ठेवा. मग ते स्वच्छ करून व्यवस्थितपणे गाळून प्या. यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या दूर होतील.

  बदाम : बदाम दुधात भिजत घालून रात्रभर ठेवा. सकाळी त्यामध्ये चंदन पावडर मिसळा. व ते डोळ्यांच्या पापण्यांना लावा. याने डोळ्यांच्या लहान- मोठ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

  वेलची : वेलचीचे दोन तुकडे घ्या. ते दुधामध्ये घालून उकळा व दररोज रात्री झोपण्याआधी प्या. आपल्या डोळ्यांना स्वस्थ बनवण्यात हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.