चहा पिताना टाळा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल विषबाधा

अनेकजण रिकाम्या पोटी चहा पितात, मात्र तसे कधीच करू नये कारण रिकाम्यापोटी चहा घेतल्यास अ‍ॅसिडिटी, कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते.

    आपण समाजामध्ये बघत असतो की चहा पिण्याची सवय ही काही व्यक्तींना खुप जास्त असते. यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. चहा हे विषासमान आहे, जे आपण रोज घेत असतो. यामध्ये आपण चहा बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला तर आपण चांगले आरोग्य जगू शकतो. चहा बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या चहाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

    यामध्ये काळी मिरी, सुंठ, तुळस, लवंग, जायफळ काहीजण चहामध्ये टाकतात. पण यात असणाऱ्या कॅफेनमुळे या पदार्थांमधील गुणधर्म चहामध्ये योग्य प्रमाणात उतरत नाहीत. जेवण झाले की चहा पिण्याची अनेकांना सवय असते. जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने जेवणातील पोषक घटक शरीरापर्यंत पोहचत नाही.

    अनेकजण रिकाम्या पोटी चहा पितात, मात्र तसे कधीच करू नये कारण रिकाम्यापोटी चहा घेतल्यास अ‍ॅसिडिटी, कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. चहा उकळवत असताना तो जास्त उकळला जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

    जास्त वेळ उकळवलेला चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. आपण ह्या सवयी बदलल्या तर चहामुळे आपल्याला त्रास होणार नाही. अनेक आजारांचे मूळ कारण चहा देखील असतो. तज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.