महत्वाची आहे बाळाची झोप

एका रेषेत सरळ उभे राहून डावा पाय उजव्या पायावर ठेवून गुंडाळायला सांगा. त्यानंतर हात वर करून ते एकमेकांत अडकवून पायाच्या विरुद्ध दिशेला करा. दोन्ही बाजूला अशा पद्धतीने कृती करून घ्या.

  झोप पूर्ण झाली नाही तर लहान मुलांची चिडचिड होते, डोके दुखते. बऱ्याचदा मुले रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे त्यांना उठायला उशीर होतो. यामुळे मुलांचेच नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी काही योगासने मुलांकडून करून घेणे फायदेशीर ठरते.

  डाऊनवर्ड फेसिंग शिपडॉग
  जमिनीवर पायाचे तळवे चिकटवून मुलाला पुढे हाताचे तळवे जमिनीवर टेकून खाली वाकायला सांगा. त्यानंतर नितंब वर करायला सांगा. ही स्थिती शिपडॉगप्रमाणे व्हायला हवी.

  सी टर्टल पोज
  तळव्याच्या आधारावर बसून शरीर पुढच्या दिशेला झुकवायला सांगा. यावेळी त्यांचे समोरच्या दिशेला पसरलेले राहू देत. या स्थिती दीर्घ श्वास घ्यायला सांगा.

  बटरफ्लाय योगासन
  मुलांना पाठीचा कणा ताठ ठेवून बसायला सांगा. दोन्ही तळवे एकमेकांना जुळतील, अशा स्थितीत बसवा. फुलपाखराप्रमाणे त्याची हालचाल करायला लावा.

  माईंडफुल ब्रेथ
  योगासन करताना मुलांना त्यांच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्यायला सांगा. तसेच त्यांना स्वतःच्या हालचालींकडे लक्ष द्यायला सांगून आपण करत असलेल्या योगासनातून आनंद घ्यायला शिकवा.

  ईगल पोज
  एका रेषेत सरळ उभे राहून डावा पाय उजव्या पायावर ठेवून गुंडाळायला सांगा. त्यानंतर हात वर करून ते एकमेकांत अडकवून पायाच्या विरुद्ध दिशेला करा. दोन्ही बाजूला अशा पद्धतीने कृती करून घ्या.