‘रेड टी’ने व्हा तजेलदार; जाणून घ्या ‘रेड टी’ आणि ‘ग्रीन टी’मधला फरक

रोज रेड टीचे सेवन केल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशीही सामना करता येतो. या चहामुळे वाढते वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. रेड टीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे आहेत.

    ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ‘रेड टी’ म्हणजेच लाल चहाचे फायदे सांगणार आहोत. अलिकडे ग्रीन टी सारखीच पसंती रेड टीला सुद्धा मिळत आहे. ज्यांना ग्रीन टीची टेस्ट पसंत नाही ते रेड टीचा आस्वाद घेतात. रेड टी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी निगडीत समस्यांचा सामनाही करावा लागत नाही.

    यामध्ये असलेल्या अॅंटीऑक्सीडेंट तत्व हृदय निरोगी ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता कमी असते. असे सांगतात की, रोज रेड टीचे सेवन केल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशीही सामना करता येतो. या चहामुळे वाढते वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. रेड टीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे आहेत. पण याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास याचा धोकाही होऊ शकतो.

    गर्भवती महिला किंवा बाळांना ब्रेस्टफिड करण्याऱ्या महिलांनी रेड टी घेऊ नये. रेड टी तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी तीन कप डाळिंबांच्या बियांची गरज आहे. या बीया तुम्ही एक कप साखरेसोबत बारीक करून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण तुम्ही साठवूनही ठेवू शकता. त्यानंतर एक चतुर्थांश कप मिश्रण घ्या, त्यात गरम पाणी मिश्रित करा. तुम्हाला हवं असेल तर त्यात थोडे मधही घालू शकता.