
मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने सर्व न्यूट्रिएंटसचा आहारात समावेश होतो. त्यामुळे त्याची चव वाढते.
मातीच्या भांड्यात ( clay pot) भोजन करणे फायद्याचे (benefits) मातीच्या भांड्यातील भोजनाची चव वेगळीच लागते. आज शहरात मातीच्या भांड्यात जेवण शिजवले जात नाही; तसेच ग्रामीण भागातही त्याचे प्रमाण कमी झाले आहे.
वास्तविक, मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास आरोग्यासाठी हे अन्न अत्यंत पोषक व लाभदायक ठरते. आपण कमी तेलात स्वयंपाक करू इच्छित असाल तर मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे चांगले ठरू शकते. आपल्या आवडीचे भोजन हे केवळ एक चमचा तेलाच्या मदतीने आरामात तयार करू शकतो.
ही एक स्लो कुकिंग प्रोसेस आहे. यामध्ये नैसर्गिकरित्या तेल तयार होते. तेल कमी वापरूनही अन्नपदार्थ चवदार आणि पौष्टिक होतो.
माती ही नैसर्गिकररित्या अल्कधर्मी गुणधर्माची असते. गरम झाल्यानंतर माती भोजनात असलेल्या अॅसिडबरोबर परस्पर क्रिया करते आणि अन्नाच्या पीएच स्तराला न्यूट्रलाईज करते.
म्हणूनच मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न पचवण्यास सुलभ ठरते. मातीच्या तव्यावर केलेली पोळी खाल्ल्याने गॅसेसची समस्या उद्भवत नाही.
मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने सर्व न्यूट्रिएंटसचा आहारात समावेश होतो. त्यामुळे त्याची चव वाढते. या आहारात कॅल्शियम, फॉक्फरस, आयर्न, मॅग्नेशियम आणि सल्फचे मिश्रण होते.