सतत सॅनिटायझर वापरणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा; सॅनिटायझर बनू शकते कॅन्सरचे कारण!

सॅनिटायझर तयार करणाऱ्या 18 ब्रँडच्या 21 बॉटल्समध्ये हे प्रमाण जास्त आढळलं होतं. संशोधनासाठी ज्या बॉटल्स घेण्यात आल्या होत्या त्या वॉलिसरच्या मुख्यालयाजवळ आजुबाजुला असलेल्या स्टोअर्समधून खरेदी करण्यात आल्या होत्या. वॅलिसरने त्यांच्या रिपोर्टनंतर यादीसह एफडीएकडे याचिकाही दाखल केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेंझीन आढळलेल्या ब्रँडची नावेही देण्यात आली आहेत.

    वॉशिंग्टन. सतत सॅनिटायझर वापरणाऱ्यांची ही महत्वाची बातमी आहे. सॅनिटायझरच्या अति वापरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे एका अभ्यासात समोर आले आहे.  कोरोनाचे आगमन झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन नागरिकांना केले. यात सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी सतत करा असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सॅनिटायझरमध्ये कर्करोगाला कारणीभूत असे काही घटक असल्याचं समोर आलं होतं. कनेक्टीकट बेस्ड ऑनलाइन फार्मसी फर्मन असलेल्या वॅलिसरने असं म्हटलं आहे की, हँड सॅनिटायझरचा वापर वाढल्यानंतर बाजारात बेंझेन कमी दिसायला लागले आहे. कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये बेंझ्ेन हे एक केमिकल असल्याचं अमेरिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं होतं. इतकंच काय तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर रिसर्चनेसुद्धा याचा समावेश हाय रिस्क कॅटेगरीत केला आहे.

    वॅलिसरने जवळपास 168 ब्रँडच्या 260 सॅनिटायझरवर संशोधन केलं. त्यापैकी 17 टक्के नमुन्यांमध्ये बेंझीनचा अंश असल्याचं आढळलं आहे. तर 21 बॉटल्समध्ये बेंझीन प्रति मिलियनमागे दोन पार्टमध्ये आढळल आहे. एफडीएने हँड सॅनिटायजरमध्ये हे प्रमाण तात्पुरत्या काळासाठी चालेल असं सांगितलं जून 2020 मध्ये सांगितलं होतं.

    सॅनिटायझर तयार करणाऱ्या 18 ब्रँडच्या 21 बॉटल्समध्ये हे प्रमाण जास्त आढळलं होतं. संशोधनासाठी ज्या बॉटल्स घेण्यात आल्या होत्या त्या वॉलिसरच्या मुख्यालयाजवळ आजुबाजुला असलेल्या स्टोअर्समधून खरेदी करण्यात आल्या होत्या. वॅलिसरने त्यांच्या रिपोर्टनंतर यादीसह एफडीएकडे याचिकाही दाखल केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेंझीन आढळलेल्या ब्रँडची नावेही देण्यात आली आहेत. बर्‍याच हँड सॅनिटायजर हे जेल असल्याचंही वॅलिसरला आढळून आलं आहे. वॅलिसरच्या निष्कर्षांची पडताळणी 401 विद्यापीठाच्या केमिकल रिसर्च सेंटरच्या लॅबने केली आहे. त्यानंतर बुधवारी वॅलिसरने एफडीएकडे यावर कारवाईची मागणी केली आहे.