नैराश्य हेच आत्महत्येचे मुख्य कारण ; जाणून घ्या ‘या’ संबंधित महत्त्वाची माहिती

आयुष्य हे खूप सूंदर आहे. या जीवनात अनेक अडथळे येतील त्याला ठामपणे तोंड द्या. पण, आत्महत्येचा विचार नकोच रे बाबा. आत्महत्येचे विचार जेव्हा तुमच्या मनात येतील, तेव्हा अगदी मन मोकळे जगायला सुरु करा. जे केले नाही ते करा. सकारात्मक विचारात रहा. सतत प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीसोबत रहा.

  नवी दिल्ली : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अलीकडेच हा १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. हा विषय फक्त एका दिवसापुरता समजून घेण्यासारखा नाही. आपल्या सर्वांना नेहमी लक्षात ठेवायला हवे की प्र जीवन खूप मौल्यवान आहे, आयुष्यात कितीही वाईट घडत असले तरी, काळानुसार गोष्टी सुधारत जातात. सर्वसाधारणपणे, बहुतेक लोक आत्महत्या करतात तेव्हा त्यांना वाटते की, आता आयुष्यातील सर्व मार्ग बंद झाले आहेत, किंवा आयुष्यात पुढे आता करण्यासारखं काहीच शिल्लक नाही. या सर्व नकारात्मक भावना व्यक्तीमध्ये तीव्र नैराश्यामुळे उद्भवतात, नैराश्य मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मानसिक आरोग्य ही एक अशी बाब आहे की ज्याबद्दल आपण बोलत नाही. किमान भारतात तरी मानसिक आरोग्याबद्दल बोलणे टाळले जाते. आपण सर्वजण आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल खूप जागरूक आहोत. त्यासाठी आपण दरवर्षी शरीर तपासणी करून, डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण जे सर्वात महत्वाचे आहे त्य आपल्या मानसिक आरोग्याला आपण कधीच महत्त्व देत नाही.

  जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन का साजरा केला जातो?

  सर्वसाधारणपणे मानसोपचारतज्ञ म्हणतात की जेव्हा तुम्हाला नैराश्याची लक्षणे जाणवू शकतात तेव्हा मानसिक आरोग्य तपासणी केली पाहिजे. पण खरं तर आपण सर्वजण दररोज घडणाऱ्या कुठल्याही छोट्या घटनांमुळे सहज उदास होतो. शालेय विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे, त्यांनादेखील वाईट वाटते, जेव्हा त्याला किंवा तिला वर्गात मित्र मैत्रीणी, शिक्षकांकडून स्वीकारले जात नाही, जेव्हा त्यांना असे वाटते की कोणीही त्याच्यासोबत नाही तो अथवा ती एकटी पडली आहे. अशी मुले हळूहळू एकलकोंडी होत जातात. नैराश्यात जातात. कमी मागून मिळणे, अभयासात मागे पडणे, मित्र मैत्रिणीचा चेष्टेचा विषय बनणे हे आपल्या सर्वांनी कधी ना कधी तरी अनुभवले आहे. या सर्व परिस्थितींना सामोरे जावे लागतेच. गृहिणीला पती किंवा सासरच्या लोकांशी असलेल्या नात्याबद्दल उदासीनता वाटू शकते. त्याचप्रकारे पतीला त्याच्या पत्नीशी असलेल्या नात्याबद्दल वाईट वाटू शकते, एखाद्याला त्याच्या मित्रांबद्दल वाईट वाटू शकते किंवा त्याच्या कार्यालयातील छोट्या -छोट्या घटना त्याच्यावर प्रभाव पाडू शकतात.आपल्या आत्मविश्वासाला धक्का देणारी कोणतीही घटना घडली की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागते. आपण सर्व आपल्या आयुष्यातील समस्यांना सामोरे जातो, कधी निराश होतो कधी हसत पुढे जातो. अनेकजण सर्व काही ठीक आहे असे भासवत आयुष्य जगत असतात . मात्र अनेकांना हे शक्य नसते. ते स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात, उदास होतात, नैराश्यात जातात आणि स्वतःच्या कोशात गुरफटून जातात तिथेच ते स्वतःला जिवंत दफन करायला लागतात. त्यांना कधीच वाटत नाह आपण यापुढे चांगले दिवस किंवा आयुष्य जगण्यास पात्र आहोत आणि इथेच सुरु होतात आत्महत्येचे विचार…

  नैराश्याच्या स्थितीवर काय उपाय आहे?
  एखाद्याच्या मनाला कधी आत्महत्येचा विचार आला तर अथवा तो नैराश्येचा सामना करीत असेल तर त्याच म्हणन अगदी शांतपणे ऐकून घ्या आणि त्याला समजवून सांगा. तुम्ही त्या व्यक्तीला थोडासा वेळ द्या आणि त्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढा. एक मित्र म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. व्यक्ती निघून गेल्यावर त्यावत शोक करत बसण्यापेक्षा आहे तोवर त्याच्याशी बोलून बघा. आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला इतर लोकांची उदाहरणे द्या. लोक कोणत्या खडतर परिस्थिती मार्ग काढतात त्यावर त्यांचे लक्ष वळवा.मानसिक तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या,आवडत्या व्यक्तीशी कायम मोकळेपणाचा संवाद ठेवा,सोशल मीडियाच्या नव्हे तर रिअल आयुष्यात जगा, मानसिक आजारांवर सकारात्मक चर्चा घडवा, असे विविध उपाय केल्यास नैराश्यग्रस्त व्यक्तीला आधार वाटू शकतो.

  आयुष्य हे खूप सूंदर आहे. या जीवनात अनेक अडथळे येतील त्याला ठामपणे तोंड द्या. पण, आत्महत्येचा विचार नकोच रे बाबा. आत्महत्येचे विचार जेव्हा तुमच्या मनात येतील, तेव्हा अगदी मन मोकळे जगायला सुरु करा. जे केले नाही ते करा. सकारात्मक विचारात रहा. सतत प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीसोबत रहा. आवडत्या व्यक्तीसोबत बोला. कोणीही नसेल तर आई-वडील, बहीण, भाऊ, शिक्षक आणि मित्र यांच्याशी बोला. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्या आधी एकदा या गोष्टी नक्की मनात आणून बघा.