नारळातील मलाईचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित का? नक्की वाचा

नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते.

  शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी नारळ पाण्याची मोठी मदत होते. तसेच नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयीही माहिती नक्की वाचा

  लोकांना असं वाटतं की नारळाची मलाई खाल्ल्यास वजन वाढतं. परंतु असं नाही, जर आपण हे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते शरीरात चरबी साठवण्याऐवजी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. नारळाच्या मलाईमध्ये असणारे पॉवर-पॅक फॅट आपल्याला बर्‍याच काळासाठी परिपूर्ण ठेवते.

  नारळाच्या मलाईला तुम्ही उर्जेचा पॉवर हाऊस म्हणून शकता. नारळाच्या लगद्यामध्ये असलेली मलाई शरीरात तत्काळ ऊर्जा निर्माण करते.

  डायबेटीस रुग्णांना नारळाची मलई न खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे वजन वाढते. मात्र नारळाची मलई डायबेटीसच्या रुग्णांमध्ये इन्शुलिन कंट्रोलमध्ये ठेवते. तसेच इतरही आजार दूर ठेवते.

  नारळामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं. तसेच या मलाईमध्ये व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं.

  मलाईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात.

  अपचन, पोटदुखी अशा समस्यावर मलाई रामबाण उपाय म्हणून काम करते. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते जे या आजारात शरीराला आराम देते.