रोज सकाळी प्या कारल्याचा रस; मिळणारे फायदे आहेत आश्चर्यकारक!

दोन ते तीन कारले घ्या आणि त्यांना पाण्याने धुवा आणि चांगले स्वच्छ करा. आता कारले सोलून घ्यावी व  चाकूच्या सहाय्याने बारीक तुकडे करून घ्या.

  लठ्ठपणा कमी करण्यासाठी कारले रामबाण उपाय आहे. कारले फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीरात लठ्ठपणा वाढू देत नाही,

  कारल्याचा रस  भूक कमी करते आणि आपले पोट भरते. कारल्याची भाजीसुद्धा गुणकारी आहे. आठवड्यातून एकदातरी कारल्याची भाजी खायला हवी.

  असा बनवा कारल्याचा रस 

  दोन ते तीन कारले घ्या आणि त्यांना पाण्याने धुवा आणि चांगले स्वच्छ करा. आता कारले सोलून घ्यावी व  चाकूच्या सहाय्याने बारीक तुकडे करून घ्या. चिरलेल्या कार्ल्यातून बिया काढून टाका.

  आता या उरलेल्या लगद्यामध्ये एका पेला पाणी घ्या आणि चवीनुसार सेंधे मीठ घाला आणि अर्ध्या तासासाठी असे ठेवा. आता हे मिश्रण ब्लेंडरमधून काडून घ्या,

  आणि त्याचे मिश्रण करा, कडूपणा कमी करण्यासाठी आपण त्यात लिंबाचा रस किंवा सफरचंद व्हिनेगर देखील घालू शकता. यामुळे कटुता काही प्रमाणात कमी होईल. कारले पाण्यात चांगले मिसळले की कापडाच्या सहाय्याने ते गाळून घ्यावेत व ते वेगळे करुन थंड होण्यास फ्रिजमध्ये ठेवा.