सावधान! नाश्त्याला रोज ब्रेड खात आहात? शरिरावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम, कॅन्सरचाही धोका

दिल्लीतील काही कंपन्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने सीएसई या संस्थेने तपासले. त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असे धोकादायक रासायनिक घटक असल्याचे तपासणीत समोर आले.

    सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरमेंट या संस्थेने दररोज ब्रेड खाणा-यांना कॅन्सर हा आजार होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला असून या संस्थेने ब्रेड आणि पिझ्झामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे कॅन्सर होऊ शकतो, असा दावा केला आहे. (Risk of cancer from eating bread).

    दिल्लीतील काही कंपन्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने सीएसई या संस्थेने तपासले. त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असे धोकादायक रासायनिक घटक असल्याचे तपासणीत समोर आल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे.

    मात्र, भारतातील अन्न प्रक्रियासंबंधीच्या कुचकामी कायद्यांमुळे भारतात त्याचा वापर सर्रास केला जात आहे. पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉईडसंबंधित अनेक आजार उद्भवतात. सीएसईच्या पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, भारतीय ब्रेड उत्पादक कंपन्या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेटचा वापर करतात.

    दरम्यान, पीएमएलने दिल्लीतील प्रसिद्ध फास्ट फूड आऊटलेटमधील 38 प्रकारच्या बे्रडच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. ब्रेड हा गव्हाचे पीठ किंवा मैदाचा वापर करून बनविले जाते. हा ब्रेड प्रत्येक घरात पोहचतो. मग कसा काय कॅन्सर होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे, मात्र मैदा किंवा पीठाने कॅन्सर होत नाही, तर ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. या केमिकल्सवर अनेक देशात आधीपासूनच बंदी आहे. अनेक देशात ब्रेड केमिकल्सवर बंदी ब्रेड बनविण्यात येणा-या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या केमिकल्सवर अनेक देशात बंदी आहे.