Eating chili reduced the risk of heart attack; Italian scientists claim

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते, तर काही लोक अगदी कमी प्रमाणात मिरची तसेच मसाल्यांचे सेवन करतात. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो(Eating chili reduced the risk of heart attack; Italian scientists claim).

    दिल्ली : मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते, तर काही लोक अगदी कमी प्रमाणात मिरची तसेच मसाल्यांचे सेवन करतात. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो(Eating chili reduced the risk of heart attack; Italian scientists claim).

    जे लोक आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या 40 टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. या अभ्यासानुसार मागील 8 वर्षांपासून इटलीच्या पॉरजील्लीमध्ये न्यूरोमेड न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूट येथील तज्ज्ञांनी हेल्दी आणि अन्हेल्दी आहार घेत असलेल्या लोकांचे निरीक्षण केले. ज्यात असे दिसून आले की मिरची खाणारे लोक हे मिरची न खाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुदृढ आहेत.

    तसेच हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते. तसेच हिरव्या मिरचीमुळे त्वचा साफ राहते. त्यामुळे, पिंपल्सपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी6, लोह, पॉटेशियम आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणे गरजेचे आहे.

    जर शुगर लेव्हल वाढली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील फॅट कमी करून मेटाबॉलिजम वाढवते. त्यामुळे मिरची शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी लाभदायक ठरते.