cancer patient

कॅन्सरग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कॅन्सरच्या वेदनांपासून त्यांची लवकरच सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कॅन्सरवर लस (Cancer Vaccines) येणार असल्याचे जर्मनीच्या संशोधकांनी म्हटले आहे.

    जगभरात कॅन्सर झालेल्या रुग्णांची(cancer patients) संख्या वाढत आहे. कॅन्सरग्रस्तांना केमो आणि रेडियो थेरपी घ्यावी लागते. ज्यामुळे होणारा त्रास, साईडइफेक्ट हे पाहता कॅन्सरवर उपचाराची अन्य कोणती उपचाराची पद्धत नाही का? असा प्रश्न अनेकजण विचारत असतात. मात्र आता या त्रासातून कॅन्सरग्रस्तांची सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कॅन्सरवर लस (Cancer Vaccine) येणार असल्याचे जर्मनीच्या संशोधकांनी म्हटले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम टय़ुरेशी यांनी कोरोनावर फायजर लस तयार केली आहे. ही लस सध्या अनेक देशांमध्ये वापरली जात आहे. याच दांपत्याने आता कॅन्सरवरील लस शोधल्याचा दावा केला आहे. कॅन्सरवरची लस जर उपयुक्त ठरली तर कॅन्सरग्रस्तांना कॅन्सरला कायमचे बाय बाय करता येणार आहे.

    दुसरीकडे कोरोनावर लस तयार करणारे ऑक्सफोर्डचे संशोधक प्रा. सारा गिल्बर्ट आणि प्रा. एड्रियान हिल हेदेखील एम-आरएनए तंत्रावर आधारित कॅन्सरवरील लस तयार करत आहेत. फुप्फुसाचा कॅन्सर झालेल्या रुग्णांवर या लसीची चाचणी करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे.