2047 पर्यंत देशातून ॲनिमिया दूर करण्याचे सरकारचं उद्दिष्ट; जाणून घ्या या आजाराची काय आहेत लक्षण

ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने तसेच अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणाची समस्या उद्भवते.

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. आरोग्याबाबत अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य अर्थसंकल्पात घोषणा करताना 2047 पर्यंत देशाला सिकलसेल ॲनिमिया ( anemia) या आजारापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आजार भारतात मोठ्या प्रमाणात पसरतो. 15 ते 50 वयोगटातील सुमारे 56 टक्के महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.

  ॲनिमिया  ही भारतातील आजचीच नाही तर फार पूर्वीपासून गंभीर समस्या आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्याचा धोका महिलांमध्ये सर्वाधिक दिसून येतो. चला या समस्येबद्दल तसेच त्याच्या लक्षणांबद्दल बोलूया, जेणेकरून आपण याला वेळीच प्रतिबंध करू शकू. 

  ॲनिमिया म्हणजे काय? 

  ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने तसेच अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणाची समस्या उद्भवते. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, याशिवाय म्हातारपणातही ॲनिमिया  ही समस्या असू शकते. महिलांमध्ये मासिक पाळीमुळे रक्ताची कमतरता जाणवते. याशिवाय योग्य आहार न घेतल्यानेही ॲनिमिया  होऊ शकतो. महिला आहारात तांबे आणि जीवनसत्त्वे कमी प्रमाणात घेतात, त्यामुळे त्यांना सिकलसेल ॲनिमिया  होण्याची शक्यता असते. सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक विकार आहे. ज्याचा शरीरातील लाल रक्तपेशींवर परिणाम होतो. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

  ॲनिमिया लक्षणे 

  त्वचा पिवळी पडणे

  हृदय गती अचानक वाढणे किंवा कमी होणे –

  वारंवार चक्कर येणे

  श्वास घेण्यास त्रास होणे

  डोकेदुखीची समस्या

  डोळे पांढरे होणे

  पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा. विशेषता लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व ब12 ह्या पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा.

  अनिमिया होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

  ‎मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांपासून दूर राहावे.

  ‎गर्भावस्थेमध्ये ॲनिमिया होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत.

  ‎मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत.