दोन रुपयाची खडीसाखर आणि कोणताही खोकला, सर्दी, छातीतील कफ होईल झटपट मोकळा

हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रथम दालचिनी (Cinnamon) घ्यायची आहे. तिच्यात प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, पोटॅशियम असे अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात आणि दालचिनीत असे अनेक गुण आहेत की, ती शरीरातील रोग नाहीसे करते.

  अनेक जणांना वारंवार सर्दी (Cold) होणे, खोकला (tussis) येणे, छातीत कफ (Cough) होणे अशा प्रकारचे विविध त्रास होत असतात. हे त्रास कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय (Home Remadies) जाणून घेणार आहोत, जो आपल्याला सहज घरातच करता येऊ शकतो आणि त्याचा फायदाही आपल्याला झटपट मिळू शकतो व आपल्याला खोकला, सर्दी, आणि आजार कधीही सतत उद्भवणार नाहीत.

  हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रथम दालचिनी (Cinnamon) घ्यायची आहे. तिच्यात प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, पोटॅशियम असे अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात आणि दालचिनीत असे अनेक गुण आहेत की, ती शरीरातील रोग नाहीसे करते. दालचिनीचे आयुर्वेदामध्ये (Ayourveda) अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ही दालचिनी औषध (Medicine) तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.

  दुसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे आले. आल्यात सर्दी, खोकला व कफ कमी करण्याचे अनेक गुण असतात. त्यामुळे आपल्या छातीत झालेला कफ बाहेर काढला जातो.

  त्याचबरोबर या आला मध्ये आपल्या शरीरामध्ये तयार झालेले वायु देखील बाहेर काढले जातात. अशाप्रकारे आले देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे. आपल्या शहरातील अनेक रोग कमी करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. तिसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर. त्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे अनेक गुण असतात. त्याचे प्रमाण वाढले असेल तर, अशावेळी खडीसाखरेचा वापर करून किंवा खडीसाखर खाऊन उष्णता कमी केली जाते.

  या तिन्ही घटकांचा वापर करून सर्दी, खोकला व कफ कमी करण्यासाठी एक औषध तयार करणार आहोत. एक कप पाणी घ्या त्यात एक छोटासा तुकडा खडीसाखर टाका. नंतर दालचिनीचे चार-पाच तुकडे बारीक बारीक करून टाकावे आणि दोन-तीन आल्याचे तुकडे बारीक करून टाकावे आणि हे एका भांड्यामध्ये घ्या आणि ते व्यवस्थित उकळू द्या. पाण्याचे अर्धा कप पाणी होईपर्यंत व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करावा.

  तयार झालेला काढा कोमट झाल्यानंतर गाळून घ्यावा व त्याचे सेवन करा. चार-पाच दिवस त्याचे सेवन केल्यामुळे सर्दी-खोकला छातीतील कफ पूर्णपणे बरा होईल. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आणि घरगुती असल्यामुळे याचा तुमच्यावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाहेरील वस्तूची आवश्यकता लागणार नाही. या वस्तू आपल्याला सहज रित्या घरामध्ये उपलब्ध होत असतात.

  Disclaimer : वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.