GreenTea पितायं ? मग हे वाचाच ; ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि ती बनवायचा योग्य मार्ग जाणून घ्या?

ग्रीन टी मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्त्वे समृद्ध आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत जे हृदयाशी संबंधित रोग टाळण्यास मदत करतात.हे प्यायल्याने फुफ्फुसे, कोलन, तोंड, पोट, आतडे, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि मेमरी ग्रंथीचा कर्करोग यासह इतर आजार टाळण्यास मदत होते.

  मुंबई : अनेक जण आता हेल्थ कॉन्सियस झाले आहेत. दुधाने कॅलरीज वाढतात म्ह्णून तर काही जण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. तर काही जण अँ टी-ऑक्सिडंट्स म्हणून हा चहा पितात. मात्र अनेकांना ग्रीन टी बद्दल योग्य माहिती नसते तर काहीजण दिवसांतून ५-६ वेळा ग्रीन टी पितात. मात्र हे शारीसाठी घातक आहे. यासाठीच आज जाणून घेऊयात ग्रीन टी बद्दल थोडी माहिती

  असा बनवा ग्रीन टी
  नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन लिटरेचर रिव्ह्यूच्या मते, किण्वन टाळण्यासाठी ग्रीन टी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये ग्रीन टी मिक्स करा. यानंतर ते झाकून ठेवा. साधारण पाच मिनिटे तसेच रादूद्या आणि त्यानंतर ग्रीन टी गरम-गरम प्या.

  आपण किती ग्रीन टी प्यावी

  ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल आणि कॅफीन असतात. एका दिवसात ३ कप पेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्याने शरीराला अपाय होऊ शकतो. रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ज्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक घटक बाहेर येतात. रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे.जेवणाच्या २ तास आधी किंवा नंतर ग्रीन टी पिऊ शकता. जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने पोषक घटकांचे प्रमाण कमी होते आणि लोह आणि खनिजे शोषण्यास अडथळा निर्माण होतो. एका दिवसात दोन ते तीन कप ग्रीन टी प्यावी.

  ग्रीन टी पिण्याचे फायदे

  ग्रीन टी मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्त्वे समृद्ध आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत जे हृदयाशी संबंधित रोग टाळण्यास मदत करतात.हे प्यायल्याने फुफ्फुसे, कोलन, तोंड, पोट, आतडे, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि मेमरी ग्रंथीचा कर्करोग यासह इतर आजार टाळण्यास मदत होते. हे आपले चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.