झुरळांनी घरात उच्छाद मांडलाय, हे उपाय नक्की करून पहा; झुरळं औषधालाही शिल्लक राहणार नाहीत

अशी त्रासदायक झुरळे (Cockroaches) जर तुमच्या स्वयंपाक (Kitchen) घरात फिरत असतील तर तुमच्या घरातील व्यक्ती नक्कीच आजारी पडतील असे समजून जा. अशा प्रकारच्या झुरळांना तुमच्या घरातून पळवून लावण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सुचवत आहोत.

    घरात झुरळांनी (Cockroaches) उच्छाद मांडलाय? बाजारातील कोणतेही केमिकल युक्त उत्पादन (Chemicals Products) वापरून देखील तुमच्या घरातील झुरळे पूर्णपणे जात नाहीत? मुळात घरामध्ये झुरळं असणं म्हणजे अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रणच (Invitation To Cockroaches) देणं होय. घाण आणि अस्वच्छता (Dirt And Uncleanliness) हेच झुरळांच्या जन्माचे कारण आहे. एका मागोमाग एक अस्वच्छतेमुळे झुरळांची संख्या वाढतच जाते.

    अशी त्रासदायक झुरळे (Cockroaches) जर तुमच्या स्वयंपाक (Kitchen) घरात फिरत असतील तर तुमच्या घरातील व्यक्ती नक्कीच आजारी पडतील असे समजून जा. अशा प्रकारच्या झुरळांना तुमच्या घरातून पळवून लावण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सुचवत आहोत.

    १. काकडी :

    काकडीचा उपयोग सॅलेड मध्ये खाण्यासाठी तर होतोच सोबतच घरभर फिरणाऱ्या झुरळांपासून सुटका करण्यातही याचा फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला फक्त काकडीचे काप झुरळ येण्याच्या जागी ठेवायचे आहेत त्याच्या वासाने आपोआपच झुरळ निघून जातील. काकडी जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते.

    २. कांदा :

    तुम्हाला माहित आहे का कांदा झुरळांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे! कांद्याचा रस काढून स्प्रे बॉटल मध्ये भरा. आणि हा रस झुरळांनी प्रभावित क्षेत्रामध्ये फवारा. काही दिवसातच झुरळांची समस्या तुमच्या घरातून संपून जाईल.

    ३. लवंग :

    घरातील कोपऱ्यांमध्ये व झुरळं येण्याच्या जागेवर लवंग टाका. त्यामुळे घरामध्ये झुरळ येण्याची संभावना कमी होते. सोबतच आधीच घरामध्ये झुरळ असतील तर त्यांना लवंगांचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते पळ काढतात.

    ४. तमालपत्र :

    प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यात तमालपत्र सहज आढळते. वाळलेल्या तमालपत्रांचे चूर्ण तयार करून घरातील कोपऱ्यात अथवा जिथे झुरळ येतात त्या जागी टाकले असता, त्याच्या वासाने घरात लपलेले सर्व झुरळे बाहेर निघून जातात.

    ५. बोरिक पावडर :

    तुम्हाला माहीत आहे का झुरळं पळवून लावण्यासाठी बोरीक पावडरचा देखील वापर होतो. दोन मोठे चमचे बोरीक पावडर गव्हाच्या पिठात मिसळून कणीक तयार करा. या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून झुरळ येतात त्या जागी ठेवा. लवकर झुरळ पळून जातील.

    ६. बेकिंग सोडा :

    एक कप बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये दोन चमचे साखर घालून पाणी घालून एक मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण घरातील कोपऱ्यांमध्ये अथवा झुरळ येतात त्या जागी टाका. हा घोळ खाऊन झुरळं मरून जातात.

    ७. अंड्याची सालं :

    अंड्याची सालं झुरळ पळवून लावण्यामध्ये अत्यंत लाभदायी आहेत. झुरळांना अंड्याचा वास आवडत नाही त्यामुळे तुम्ही अंड्याची टरखलं झुरळ येण्याच्या जागी ठेवून देऊ शकता.

    ८. रेड वाईन :

    स्वयंपाक घरात रेड वाईन ठेवल्याने झुरळ पळून जातात. एका वाटीत रेड वाईन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. हे पिऊन झुरळं मरतील.

    ९. रॉकेल :

    रॉकेल मधून येणारा स्ट्रॉंग वास झुरळांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे रॉकेलच्या फवाऱ्याने झुरळ तो वास सहन न करता आल्यामुळे पळून जातात.

    १०. कॉफी पावडर :

    सगळ्यात अनोखा आणि अचूक उपाय झुरळांना पळवून लावण्यासाठी आहे तो म्हणजे कॉफी! कॉफीच्या बिया अथवा कॉफी पावडर जिथे झुरळ येतात त्या जागी ठेवावे. कॉफी झुरळांना खूप आवडते. परंतु हीच कॉफी त्यांचा जीव घेते. झुरळ कॉफी पावडर खाऊन मरून जातात. मात्र नंतर तुम्ही या जागेची नीट स्वच्छता करा.

    वर नमूद केल्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल तो उपाय तुम्ही करून बघू शकता. परंतु सोबतच आपल्या घरातील कोपरान् कोपऱ्याची सफाई करण्यास तुम्ही विसरू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हे उपाय/प्रयोग तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

    Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. नवराष्ट्र.कॉम या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.