कुत्रा चावला, साप चावला किंवा कोणताही किटक चावला तर या गोष्टी अजिबात करु नका नाही तर…

शहरी भागात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना खूप घडतात. पर्यटनाच्या ठिकाणी अनेकदा माकडे आपल्याला त्रास देतात. हातातला खाऊ हिसकावून घेणेहे माकडांच्या बाबतीत नित्याचेच झाले आहे. खाऊ दिला नाही तर ही माकडे चावतात देखील. ग्रामीण भागात साप, विंचू चावणे, उंदीर चावणे, विषारी कीटकांनी चावा घेणे असे प्रकार खूप घडतात. प्राण्यांचा चावा हा प्रकार गंभीर असला तरी त्यावर न घाबरता काही उपाय केले आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला की, त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडू शकतो(Home Remedies for Animal or Insect Bites).

  कुत्रा किंवा माकडाने चावा घेतल्यास

  कुत्रा किंवा माकडाने चावा घेतल्यास सर्वात आधी जखम चांगल्या तर्‍हेने धुवा. त्यानंतर साबण लावून धुवा. या जखमेवर पट्टी बांधू नका. त्वचेवर खरचटल्यासारखे झाले असेल किंवा एक किंवा दोन दात जरी उमटले असले तरी चोवीस तासांच्या आत अँटिरॅबीज इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. कारण रेबीजचा विषाणू अनेक वर्षांनंतरही सक्रिय होऊ शकतो. जखम खोल असेल तर सक्रिय लसीकरण अंतर्गत दोन इंजेक्शन डॉक्टर लगेच देतात. यात अँटिरेबीज सीरम आधी स्नायूंत (दंडात किंवा कंबरेत) आणि दुसरे जिथे कुत्रा, मांजर किंवा माकडाने चावा घेतला आहे, त्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे घातले जाते. यानंतर निष्क्रिय किंवा पॅसिव लसीकरण होते, त्यात पाच इंजेक्शन्स ठराविक कालावधीत घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन चावा घेतलेल्या दिवशी, दुसरे चावल्याच्या तिसर्‍या दिवशी, तिसरे चावल्याच्या सातव्या दिवशी, चौथे चावल्याच्या चौदाव्या दिवशी आणि पाचवे चावल्याच्या अठ्ठाविसाव्या दिवशी दिले जाते.

  सापाने चावल्यास

  साप चावल्यावर अजिबात घाबरून जाऊ नका. ज्या ठिकाणी तो चावला असेल त्याच्या आजूबाजूचे कपडे आणि दागिने काढून टाका. म्हणजे तो भाग सुजल्यावर तेथे ते अडकणार नाहीत. साप चावल्याच्या भागावर पाणी आणि साबण किंवा अँटिसेप्टिक सोल्युशन म्हणजे डेटॉल वगैरेने चांगल्या तर्‍हेने स्वच्छ करा आणि त्यावर स्वच्छ कपड्याचे आच्छादन घाला, जेणेकरून संसर्ग होणार नाही. चावल्याच्या भागावर कोणताही दबाव टाकून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याचप्रमाणे कापूही नका.

  सापाने शरीराच्या ज्या भागावर चावा घेतला असेल, त्या भागावर चावलेल्या जागेपासून दोन अडीच इंच वरच्या बाजूला प्रेशर बँडेज किंवा एखाद्या दोरीने अथवा कपड्याने घट्ट बांधा. त्यामुळे त्या भागातील रक्ताचा प्रवाह मंद होईल आणि रक्तातून विष भिनण्याची शक्यता कमी होईल. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की, ही दोरी किंवा कपडा एकूणच रक्तप्रवाहच बंद होईल इतका घट्ट बांधायचा नाही.

  साप चावलेला शरीराचा भाग हृदयाच्या खालच्या बाजूला येईल अशा तर्‍हेने रुग्णाला ठेवावे. तोंडातून फेस येत असेल तर त्याच्या दातांमध्ये रूमाल ठेवा, म्हणजे त्याची जीभ दातांत अडकून कापली जाणार नाही. रुग्णाशी बोलत राहा म्हणजे तो शुद्धीवर राहील. त्याचबरोबर त्याला धीर देत रहा. तो घाबरणार नाही, खचणार नाही याची काळजी घ्या. नाहीत रक्तदाबाची गडबड होऊ शकते, अगदी हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्यता असते. रुग्णाला यानंतर ताबडतोब इस्पितळात न्या. तेथे विषरोधक इंजेक्शन देऊन उपचार केले जातात.

  एक लक्षात ठेवा, विषरोधक इंजेक्शन एकदाच घ्यायचे असते. अँटी रॅबीजप्रमाणे त्याचा कोर्स असत नाही. चावलेल्या सापाला मारले असेल तर तो साप घेऊन डॉक्टरांकडे जा. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे सोपे जाईल.

  हे सुद्धा वाचा
  • 2022